TRENDING:

ना निवडणूक, ना मतांचं राजकारण, पण मनसैनिकासाठी अमित ठाकरे सोलापुरात, हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या लेकरांची जबाबदारी स्वीकारली

Last Updated:
सोलापूर महानगरपालिका काळात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली. त्यांच्या परिवाराची मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.
advertisement
1/7
ना निवडणूक, ना मतांचं राजकारण, पण मनसैनिकासाठी अमित ठाकरे सोलापुरात, हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या लेकरांची जबाबदारी स्वीकारली
सोलापूर महापालिका निवडणूक काळात हत्या झालेल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.
advertisement
2/7
सरवदे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगताना त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी असेल, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले.
advertisement
3/7
सोलापूर महानगरपालिका काळात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली. भाजपच्या नगरसेविकेवर त्यांच्या हत्येचा संशय होता. त्यांना या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. सरवदे यांच्या हत्येनंतर राज्यभरातील मनसैनिकांनी या घटनेचा निषेध केला होता.
advertisement
4/7
ऐन निवडणुकीची धामधुम सुरू असतानाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात जाऊन सरवदे कुटुंबाचे सांत्वन केले होते. त्यानंतर आता पुन्हा अमित ठाकरे यांनी सोलापुरात जाऊन सरवदे कुटुंबाची भेट घेतली.
advertisement
5/7
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात जाऊन काही दिवसांपूर्वी निवडणुकीत राजकीय बळी ठरलेल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची दुसऱ्यांदा भेट घेत त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत भविष्याची हमी दिली.
advertisement
6/7
कठीण प्रसंगात कार्यकर्त्याच्या कुटुंबामागे ठामपणे उभा राहणाऱ्या अमित ठाकरे यांच्या कृतीमुळे मनसे हा केवळ पक्ष नसून एक कुटुंब आहे, अशा भावना पक्षातील लोक व्यक्त करीत आहेत.
advertisement
7/7
सोलापुरात गेलेल्या अमित ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. सोलापूर जिल्ह्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. गारपिटीमुळे अत्यंत नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ना निवडणूक, ना मतांचं राजकारण, पण मनसैनिकासाठी अमित ठाकरे सोलापुरात, हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या लेकरांची जबाबदारी स्वीकारली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल