TRENDING:

Jyeshthamadh Benefits : ज्येष्ठमध खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे! कोणी आणि कसे खावे?

Last Updated:
जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे. यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात.
advertisement
1/7
ज्येष्ठमध खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे! कोणी आणि कसे खावे?
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिका शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. परंतु जेष्ठमधाचा मर्यादित प्रमाणातच वापर केल्यास फायदा होतो, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
advertisement
2/7
पित्त, अॅसिडीटी : ज्येष्ठमधाचा वापर पित्तनाशक म्हणून देकील केला जातो. कोणाला खूप अॅसिडीटीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्यांना ज्येष्ठमधाच्या चूर्णासह मध, तूप आणि आवळ्याचे पावडर मिक्स करून त्याचे चाटण खायला देऊ शकता. यामुळे अॅसिडीटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
advertisement
3/7
अतिसार, डायरीया : तुम्ही अतिसारमुळे त्रस्त असाल तर ज्येष्ठमध तुमच्यााठी गुणकारी ठरू शकतो. यासाठी ज्येष्ठमधसोबत खडीसाखर, जायफळ आणि डाळिंबाच्या सालीची पावडर यांचा काढा करून तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
advertisement
4/7
ताप, फिव्हर : तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून ज्येष्ठमधाचा वापर करू शकता. अशा स्थितीत ज्येष्ठमधाच्या पावडरसोबत तुम्ही त्यात मनुके, मोहाचे फूल आणि त्रिफळा घालून वाटून बारीक करा आणि रात्रभर गरम पाण्यात भिजूवा. सकाळी हे पाणी प्या. यामुळे आराम मिळेल.
advertisement
5/7
सांधिवात : जेष्ठमधाचा अनेक रोगांवर फायदा होतो त्यापैकी एक म्हणजे संधिवात. जेष्ठमधात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. यामुळे सांधिवातासारख्या त्रासात वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
advertisement
6/7
घसा खवखवणे : जेष्ठमध घशासाठी तर रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला घशात खवखव होत असेल किंवा सर्दी, खोकला यासारखा त्रास होत असेल तर तुम्ही जेष्ठमधाचे खाऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.
advertisement
7/7
डोळ्यांसाठी फायदा : ज्येष्ठमध डोळ्यांसाठी टॉनिकप्रमाणे काम करते. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. यासाठी ज्येष्ठमधाच्या पावडरसोसोबत त्रिफळाचूर्ण, दूध आणि तूप एकत्र करून फ्या. त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jyeshthamadh Benefits : ज्येष्ठमध खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे! कोणी आणि कसे खावे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल