Shukra Gochar 2025: शुक्रदेव 9 ऑक्टोबरला कन्या राशीत! या 3 राशीच्या लोकांवर वाईट वेळ आणणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सौंदर्य, संपत्ती, प्रेम आणि भौतिक सुखसोयींचे कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह दर महिन्याला आपली राशी बदलून पुढच्या राशीत जातो. शुक्रानं रास बदलल्याचा सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, येत्या 9 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते, पण काही राशींना हा काळ आव्हानात्मक ठरणार आहे.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा नवग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ ग्रह मानला जातो. याला दैत्यगुरु (असुरांचे गुरू) असेही म्हणतात. शुक्र साधारणपणे दर 23 ते 26 दिवसांनी आपली रास बदलतो. म्हणजेच, तो एका राशीत सुमारे 23-26 दिवस राहतो. शुक्र गोचरमुळे व्यक्तीच्या प्रेम जीवन, आर्थिक स्थिती आणि भौतिक सुखांवर मोठा परिणाम होतो.
advertisement
2/5
शुभ गोचर असल्यास प्रेम, धन आणि व्यवसायात फायदा होतो. अशुभ गोचर किंवा कमजोर असल्यास आर्थिक अडचणी, वैवाहिक जीवनात तणाव आणि सुख-सुविधांची कमतरता जाणवू शकते. कन्या राशीतील गोचर काही राशींसाठी अशुभ ठरू शकते, या राशींबद्दल जाणून घेऊया.
advertisement
3/5
मेष - शुक्राचे कन्या राशीत संक्रमण मेष राशीसाठी काही आव्हाने निर्माण करू शकते. या काळात, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामात तुम्हाला अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे ताण वाढू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधांमध्येही गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.
advertisement
4/5
धनू - धनू राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शुक्राच्या या संक्रमणाचा तुमच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च वाढतील. कौटुंबिक वातावरण अशांत असेल. या काळात लांब प्रवास टाळा किंवा करत असल्यास सावध रहा. हुशारीने निर्णय घ्या. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा.
advertisement
5/5
मीन - मीन राशीसाठी शुक्राचे गोचर त्रासदायक ठरू शकते. शुक्र राशीचा कन्या राशीत प्रवेश हानिकारक ठरू शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. व्यावसायिक भागीदारीत वाद निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल देखील सावधगिरी बाळगावी लागेल. उतावळे होऊन चालणार नाही, संयम बाळगा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2025: शुक्रदेव 9 ऑक्टोबरला कन्या राशीत! या 3 राशीच्या लोकांवर वाईट वेळ आणणार