हेलिकॉप्टर बैजा-ब्रेक फेल जोडीने मारलं बैलगाडा शर्यतीचं मैदान, जिंकली फॉर्च्युनर,स्पर्धेचे खास PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षीसांचा धुरळा उडवलाय. तब्बल अडीच हजार बैलगाडा मालक या शर्यतीत सहभागी झाले आहेत.
advertisement
1/7

देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे.
advertisement
2/7
कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी पटकावली आहे.
advertisement
3/7
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या शर्यतीचा बक्षीस वितरण सोहळा हा मंत्रालयात पार पडणार आहे, अशी माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.
advertisement
4/7
देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून बोरगावच्या कोड्याच्या माळ येथील 500 एकर मैदानावर या शर्यतीचे आयोजन केलं होतं.
advertisement
5/7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत फॉर्च्यूनर गाडी जिंकली आहे.
advertisement
6/7
बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.
advertisement
7/7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षीसांचा धुरळा उडवलाय. तब्बल अडीच हजार बैलगाडा मालक या शर्यतीत सहभागी झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
हेलिकॉप्टर बैजा-ब्रेक फेल जोडीने मारलं बैलगाडा शर्यतीचं मैदान, जिंकली फॉर्च्युनर,स्पर्धेचे खास PHOTO