TRENDING:

'पुरुष कोणत्या नजरेने...', हिंदू मुलीशी लग्न केलं, आता हिजाब घालण्याच्या सक्तीवर स्पष्टच बोलला अभिनेता

Last Updated:
सोशल मीडिया स्टार अदनान शेख सध्या आपल्या प्रोफेशनल कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे वादात अडकलेला आहे. नुकतंच त्याने महिलांबद्दल, विशेषतः त्याच्या पत्नीबद्दल जे वक्तव्य केलं आहे, त्यावरून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
advertisement
1/7

2/7
२०२४ मध्ये अदनान आणि त्याची पत्नी आयशाचं लग्न झालं. अदनानची पत्नी हिंदू असून तिने लग्नाआधी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारलं. यावरून सोशल मीडियावर जो गदारोळ झाला तो अजूनही शमलेला नाही. आता ती पूर्णवेळ बुरखा आणि हिजाबमध्ये असते.
advertisement
3/7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदनानला जेव्हा त्याच्या पत्नीच्या हिजाबवरून प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने कोणाचीही पर्वा न करता सडेतोड उत्तर दिलं आहे. तथापि, त्याच्या उत्तरामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
advertisement
4/7
एका मुलाखतीत अदनानला विचारण्यात आलं की त्याने त्याच्या पत्नीला हिजाब घालण्यासाठी प्रवृत्त केलं आहे का? यावर अदनान भडकून म्हणाला, "लोकांना काय बोलायचंय ते बोलू द्या. हे माझं आयुष्य आहे आणि मी ते माझ्या पद्धतीने जगणार. ज्यांना माझी पत्नी हिजाबमध्ये पाहून अडचण होत आहे, त्यांनी खुशाल आपल्या घरच्या स्त्रियांना जगासमोर दाखवावं. मी माझ्या पत्नीचा चेहरा कोणालाही दाखवणार नाही."
advertisement
5/7
इतकंच नाही, तर त्याने पुरुषांच्या मानसिकतेवरही भाष्य केलं. तो म्हणाला, "मी एक मुलगा आहे आणि मला चांगलंच ठाऊक आहे की पुरुष स्त्रियांकडे कोणत्या नजरेने बघतात. आपल्या धर्मात असं म्हटलंय की, जर स्त्रियांना हे समजलं की पुरुष त्यांना कसं बघतात, तर त्या स्वतःला झाकल्याशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवणार नाहीत."
advertisement
6/7
अदनानने हिंदू मुलीशी लग्न केलं असून तिचं लग्नाआधीच नाव रिद्धी असं होतं. लग्नाआधी तिने धर्मांतर करून स्वतःचं नाव आयशा असं बदललं. यानंतर अदनानवर लव्ह जिहादचे आणि जबरदस्तीने पत्नीचं धर्मांतर केल्याचे आरोप झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना अदनान म्हणाला, "तिने स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला आहे. भारतात प्रत्येकाला आपलं आयुष्य कसं जगावं याचं स्वातंत्र्य आहे. कोणावरही काहीही लादता येत नाही."
advertisement
7/7
सध्या अदनान आपल्या कुटुंबासोबत आनंदी असून अदनान आणि आयशाला एक मुलगाही आहे. त्याच्या म्हणण्यांनुसार, तो 'दीन' (धर्म) आणि 'दुनिया' (जग) या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून जगतो. त्याच्या मते, ज्या स्त्रिया पडदा पाळत नाहीत, त्यांना जन्नतची हवाही मिळणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पुरुष कोणत्या नजरेने...', हिंदू मुलीशी लग्न केलं, आता हिजाब घालण्याच्या सक्तीवर स्पष्टच बोलला अभिनेता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल