TRENDING:

VIDEO : भावा सांभाळून, 12 कोटीची फरारी खुप मेहनतीने घेतली...चाहत्यांची गर्दी बघून हार्दिकचा पारा चढला

Last Updated:

हार्दिक पांड्या पुन्हा एकदा फरारी घेऊन आला.चाहत्यांना कळताच त्यांनी गर्दी जमली होती.यावेळी गर्दीमुळे गाडीला काही होऊ नये म्हणून हार्दिक पांड्या चाहत्यांना म्हणाला सांभाळून भावांना खूप मेहनतीने घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hardik Pandya Ferrari 12 CILINDRI Supercar : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याने फरारी 12 सिलिंड्री कार घेतली आहे. नुकतीच ही फरारी कार तो गंर्लफ्रेंड माहिकासोबत मुंबईच्या रस्त्यावर चालवताना दिसला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला होता.त्यानंतर आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा फरारी घेऊन आला.चाहत्यांना कळताच त्यांनी गर्दी जमली होती.यावेळी गर्दीमुळे गाडीला काही होऊ नये म्हणून हार्दिक पांड्या चाहत्यांना म्हणाला सांभाळून भावांना खूप मेहनतीने घेतली आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
hardik pandya farari
hardik pandya farari
advertisement

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या एका ठिकाणावरून येतो आणि आपल्या नवीन फरारी गाडीत बसायला जातो.यावेळी चाहत्यांना हार्दिक आल्याची आधीच माहिती मिळाली असल्याने त्यांची एकच गर्दी जमते. त्यानंतर हार्दित एकताच चाहते त्याला हार्दिक भाई कॉग्रेच्युलेशन म्हणत त्याला शुभेच्छा देतात. या दरम्यान एक चाहता समोरून येत असतो.तो ज्या अवस्थेत समोर येतो ते पाहता गाडीला इजा होईल असे वाटत होते.त्यामुळे तो त्याला म्हणतो भाऊ सांभाळून,खूप मेहनतीने गाडी घेतली आहे.त्यानंतर हार्दिक आपल्या गाडीतून निघून जातो.

advertisement

हार्दिक पांड्याच्या नवीन सुपरकार, फेरारी 12 सिलेंडरची ऑन-रोड किंमत सुमारे 12 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. नेरो डेटोना रंगाची ही कार जगभरातील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे आणि हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत मुंबईच्या रस्त्यांवर ही गाडी चालवताना दिसला होता.

advertisement

फेरारी कारची वैशिष्ट काय?

हार्दिक पांड्याच्या नवीन फेरारी 12 सिलेंडरच्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या सुपरकारचा लूक 60वर्षांपूर्वीच्या क्लासिक 365 GTB/4 डेटोना पासून प्रेरित आहे. यामध्ये आधुनिक एरोडायनॅमिक्स, भविष्यवेधी डिझाइन, फ्लश डोअर हँडल्स, बोनेटवर काळा पट्टा आणि रॅप-अराउंड एलईडी बार, आकर्षक एलईडी डीआरएल, मागील बाजूस धारदार टेललाइट्स, ॲक्टिव्ह रिअर फ्लॅप्स आणि 21-इंची अलॉय व्हील्स यांसारख्या बाह्य वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

advertisement

नवीन फेरारी 12 सिलेंडरच्या केबिनमध्ये ट्रिपल डिस्प्ले सेटअप आहे, ज्यामध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 15.6-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रवाशांना ड्रायव्हिंग-संबंधित माहिती पुरवणारी दुसरी 8.8-इंचाची स्क्रीन समाविष्ट आहे. फेरारीच्या एसयूव्ही पुरोसांग्वेपासून प्रेरित असलेल्या या केबिनमध्ये 1600-वॉटची, 15-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टीम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमेरा आणि ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

फेरारीची 12-सिलेंडर सुपरकार तिच्या शक्तिशाली V12 इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये 6.5-लिटरचे नॅचरली ॲस्पिरेटेड V12 इंजिन आहे, जे 830 हॉर्सपॉवर आणि 678 Nm टॉर्क निर्माण करते. 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली ही सुपरकार केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग गाठते आणि तिचा सर्वोच्च वेग 340 किमी/तास आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : भावा सांभाळून, 12 कोटीची फरारी खुप मेहनतीने घेतली...चाहत्यांची गर्दी बघून हार्दिकचा पारा चढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल