TRENDING:

पोलिसांनी लोणावळ्यातील 500 व्हिलांची घेतली झडती, 'त्या' आलिशान घराचा दरवाजा उघडताच हादरले, चौघांचं कांड पाहून पुण्यात खळबळ

Last Updated:

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील व्हिला आणि गेस्ट हाऊसचा वापर आता सायबर गुन्ह्यांसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लोणावळा : राज्यात सायबर फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. रोज काही ना काही फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. मात्र, आता सायबर गुन्हेगारांना अद्दल घडवणारी एक बातमी समोर आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील व्हिला आणि गेस्ट हाऊसचा वापर आता सायबर गुन्ह्यांसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी लोणावळ्यातील तब्बल ४०० ते ५०० व्हिलांची कसून झडती घेतली, त्यानंतर सायबर चोरट्यांना पकडण्यात मोठं यश आलं आहे.
गेस्ट हाऊसचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी  (प्रतिकात्मक फोटो)
गेस्ट हाऊसचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

या प्रकरणी मोनिल मोदी, रवी जाट, रुद्रपाल सिंग आणि हंश वर्मा या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी गुजरात, मध्य प्रदेश आणि मुंबईतील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपींवर परदेशातून वेब कॅमेऱ्याद्वारे थेट नियंत्रण ठेवले जात होते. या टोळीने विविध बँकांमध्ये करंट अकाउंट उघडून फसवणुकीचे पैसे वळवले होते. तपासात एकाच बँक खात्यातून १ कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत आरोपींकडून लॅपटॉप, ७ मोबाईल, १४ डेबिट कार्ड्स, वेब कॅमेरे आणि बँक किट्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांनी देशातील विविध बँकांमध्ये खाती उघडून त्यांचा गैरवापर केल्याची कबुली दिली आहे. लोणावळ्यातील शांत आणि आलिशान वातावरणाचा फायदा घेत हे गुन्हेगार आपले रॅकेट चालवत होते. सायबर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पोलिसांनी लोणावळ्यातील 500 व्हिलांची घेतली झडती, 'त्या' आलिशान घराचा दरवाजा उघडताच हादरले, चौघांचं कांड पाहून पुण्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल