'माझी पोरगी परत द्या, नाहीतर...', 6 महिन्यांच्या प्रेमासाठी पोटच्या लेकीने फिरवली पाठ! मोनालिसाच्या आईने फोडला हंबरडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Monalisa Bhosle Marriage: याआधी फरमानचे वडील आणि मोनालिसाच्या वडिलांनी या लग्नाला मंजुरी नसल्याचं सांगितलं होतं. अशातच आता मोनालिसाच्या आईने हंबरडा फोडला असून लेकीच्या आठवणीत त्या ओक्साबोक्सी रडताना दिसल्या.
advertisement
1/9

गेल्या वर्षी पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यातून माळा विकणारी मोनालिसा रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. बघता बघता तिला फिल्मची ऑफरही मिळाली. मात्र, एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली ही मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/9
मागच्या आठवड्यातच मोनालिसाने तिचा मुस्लिम बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले. त्यांनी केरळच्या एका मंदिरात अतिशय साधेपणाने लग्न केले असले तरीही या लग्नाने काही वेळातच संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर अनेकांनी फरमानवर लव्ह जिहादचाही आरोप केला.
advertisement
3/9
सततच्या होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोनालिसा आणि फरमान यांनी पत्रकारपरिषदही घेतली आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर सडेतोड उत्तरं दिली. तथापि, मोनालिसा आणि फरमानच्या कुटुंबियांना हे लग्न अजिबात पटलेलं नसून दोन्ही बाजूच्या पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
4/9
याआधी फरमानचे वडील आणि मोनालिसाच्या वडिलांनी या लग्नाला मंजुरी नसल्याचं सांगितलं होतं. अशातच आता मोनालिसाच्या आईने हंबरडा फोडला असून लेकीच्या आठवणीत त्या ओक्साबोक्सी रडताना दिसल्या.
advertisement
5/9
मोनालिसाच्या लग्नाची बातमी मिळताच, तिच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोनालिसाच्या या निर्णयाने तिची आई पूर्णपणे कोलमडून गेली आहे. गेल्या १० दिवसांपासून लेकीशी कोणताही संपर्क नसल्याने आईचा जीव टांगणीला लागला आहे.
advertisement
6/9
नुकतंच माध्यमांसमोर बोलताना मोनालिसाची आई धाय मोकलून रडली. इतकंच नाही, तर लेकीच्या आठवणीत रडताना ती अचानक जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली.
advertisement
7/9
यावेळी मोनालिसाची आई रडत रडत म्हणाली, "माझ्या बाबूची मला खूप आठवण येतेय. तिच्याकडे तिचा फोनही नाहीये, मी तिच्याशी बोलू तरी कशी? ती अजून लहान आहे, तिला काहीच समजत नाहीये. तिला कोणीतरी परत आणा, नाहीतर मी काहीतरी खाऊन स्वतःचा जीव देईन."
advertisement
8/9
मोनालिसाच्या वडिलांनीही आपलं दुःख व्यक्त केलं आहे. मोनालिसाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, केवळ सहा महिन्यांच्या ओळखीसाठी आणि प्रेमासाठी मोनालिसाने आपल्या आई-वडिलांना डावललं. तिच्या लग्नाबद्दल आमच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण तिने फरमानसोबत थेट केरळमध्ये जाऊन लग्न केलं.
advertisement
9/9
दरम्यान, कुटुंबाने या प्रकरणाला लव्ह जिहाद असं संबोधलं असून, तिचे दोन्ही फोन बंद असल्याने त्यांच्या मनातील संशय बळावला आहे. एकीकडे मोनालिसा केरळमध्ये आपल्या नवीन आयुष्याचा आनंद घेत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. आई-वडिलांना अशा परिस्थितीत सोडून गेल्यामुळे नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझी पोरगी परत द्या, नाहीतर...', 6 महिन्यांच्या प्रेमासाठी पोटच्या लेकीने फिरवली पाठ! मोनालिसाच्या आईने फोडला हंबरडा