TRENDING:

'काही लोक असे असतात...' गिरिजा ओकने सांगितला 'कांतारा' फेम अभिनेत्यासोबत इंटिमेट सीनचा अनुभव

Last Updated:
Girija Oak on Intimate Scene : एका इंटिमेट सीनच्या शूटिंगचा अनुभव सांगताना गिरिजाने सहकलाकार गुलशन देवय्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
advertisement
1/8
गिरिजा ओकने सांगितला 'कांतारा' फेम अभिनेत्यासोबत इंटिमेट सीनचा अनुभव
मुंबई: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरिजा ओक आता हिंदी वेब सीरिजमध्येही आपला ठसा उमटवत आहे. लवकरच ती 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमधून झळकणार आहे.
advertisement
2/8
या सीरिजमधील एका इंटिमेट सीनच्या शूटिंगचा अनुभव सांगताना गिरिजाने सहकलाकार गुलशन देवय्याचे तोंडभरून कौतुक केले आहे, ज्यामुळे त्याची जेंडर सेन्सिटिव्हिटी दिसून येते. 'कांतारा चॅप्टर १' आणि 'उलझ' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला गुलशन आणि गिरिजा या सीरिजमधून एकत्र काम करत आहेत.
advertisement
3/8
'लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत गिरिजा ओकने इंटिमेट सीनच्या शूटिंगबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. सामान्यतः अशा सीन्ससाठी इंटिमेट को-ऑर्डिनेटर असतात, पण तरीही अवघडलेपणा जाणवू शकतो, असे तिने सांगितले.
advertisement
4/8
गिरिजा म्हणाली, "काही लोक असे असतात, ज्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला संकोच वाटत नाही. गुलशन त्यापैकी एक आहे. त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार वेगवेगळ्या उशा आणल्या होत्या आणि मला त्यातली जी आवडेल, ती निवडायला सांगितली."
advertisement
5/8
"तो पूर्ण सीन करताना त्याने मला निदान १६ ते १७ वेळा विचारले असेल की, 'मी ठीक आहे की नाहीये?' इतक्या आदराने त्याने ती काळजी घेतली," असे गिरिजाने सांगितले.
advertisement
6/8
असे संवेदनशील सीन शूट करताना अनेकदा कलाकार अवघडलेल्या परिस्थितीत अडकू शकतात किंवा सीन थांबवायचा की पुढे करायचा, या संभ्रमात पडू शकतात. पण गुलशनच्या वागण्यामुळे गिरिजाला खूप आधार मिळाला.
advertisement
7/8
गिरिजाने सहकलाकाराचे कौतुक करत म्हटले, "तो खूप चांगला माणूस आहे. तो होता, म्हणून तो सीन करणं सोपं गेलं. आज याबद्दल मी उघडपणे बोलू शकते, कारण गुलशनने तितक्या आदरपूर्वक काळजीने तो सीन केला."
advertisement
8/8
सचिन पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नेहा धुपियाचाही समावेश आहे, पण 'थेरपी शेरपी'च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'काही लोक असे असतात...' गिरिजा ओकने सांगितला 'कांतारा' फेम अभिनेत्यासोबत इंटिमेट सीनचा अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल