TRENDING:

'त्यांनी खूप सोसलं...', राखी सावंतचा सुनीता आहुजाला खुल्लमखुल्ला पाठिंबा, गोविंदाच्या कॅरॅक्टरबद्दल म्हणाली....

Last Updated:
Rakhi Sawant on Govinda-Sunita Ahuja Relationship : सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत हिने यावेळी थेट अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक नात्यावर टिप्पणी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
advertisement
1/8
राखी सावंतचा सुनीता आहुजाला ओपन पाठिंबा, गोविंदाच्या कॅरॅक्टरबद्दल म्हणाली...
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत हिने यावेळी थेट अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक नात्यावर टिप्पणी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
advertisement
2/8
नुकत्याच सुनीता आहुजा यांनी गोविंदाबद्दल केलेल्या धक्कादायक विधानांवर राखीने सुनीता आहुजांना जोरदार पाठिंबा दिला असून, गोविंदाच्या कॅरेक्टरवरही भाष्य केले आहे. राखी सावंतने सुनीता आहुजांचे वर्णन '२४ कॅरेट गोल्ड' असे केले आहे आणि त्या एक मस्त व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
advertisement
3/8
लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार, राखी सावंतने सुनीता आहुजांच्या बेधडक स्वभावाची प्रशंसा केली आहे. राखी सावंत म्हणाली की, ती सुनीता आहुजांचे व्लॉग्स नियमितपणे पाहते आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर ती फिदा आहे.
advertisement
4/8
राखी पुढे म्हणाली, "त्यांना जे योग्य वाटतं, ते त्या बोलून दाखवतात. मी त्यांना सॅल्यूट करते. जेव्हा त्या म्हणतात, 'ते सगळं सहन करण्याचा काळ गेला, माझा नवरा आता स्टार राहिला नाही,' तेव्हा जाणवतं की त्यांनी खूप काही सोसलं आहे. त्या मला निर्मळ मनाच्या वाटतात."
advertisement
5/8
राखी सावंतच्या या विधानांनी गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील जुना तणाव पुन्हा चर्चेत आला आहे. सुनीता आहुजांचा जोरदार बचाव करताना राखी सावंतने गोविंदाच्या कॅरेक्टर आणि अफेअरच्या चर्चांवरही भाष्य केले.
advertisement
6/8
राखी सावंत म्हणाली, "मी गोविंदाला अनेक वेळा भेटले आहे. स्ट्रगलच्या काळात मी त्यांच्यासोबत अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे आणि अनेक शोमध्येही भेटले आहे, पण त्यांनी माझ्याकडे कधीही नजर वर करून पाहिले नाही." या विधानातून राखीने गोविंदाच्या वागणुकीवर एक प्रकारे उपहासात्मक टिप्पणी केली आहे.
advertisement
7/8
२०२४ च्या अखेरीस गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठ्या समस्या असल्याची आणि सुनीता यांनी धोका-अत्याचाराचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केल्याची अफवा होती. मात्र, नंतर या जोडप्याने सार्वजनिकपणे स्पष्ट केले की, ते वेगळे होत नाहीत. "आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही," असे सुनीता आहुजा यांनी म्हटले होते.
advertisement
8/8
त्यांनी काही काळ वेगळे राहिल्याची कबुली दिली, पण त्यांचे नाते मजबूत असल्याचे आणि सर्व गैरसमज दूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. अशातच राखी सावंतच्या या नवीन वक्तव्यामुळे, गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्यांनी खूप सोसलं...', राखी सावंतचा सुनीता आहुजाला खुल्लमखुल्ला पाठिंबा, गोविंदाच्या कॅरॅक्टरबद्दल म्हणाली....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल