TRENDING:

Kitchen Tips : कुकरमध्ये भात शिजवताना किती शिट्ट्या कराव्या? सरसकट 3 तर नाहीच, मग किती?

Last Updated:
Pressure Cooker Whistles For Rice : आता बहुतेक जण कुकरमध्ये भात शिजवतात, काही जण दोन, काही जण तीन तर काही जण चार शिट्ट्या करतात. मग नेमक्या किती शिट्ट्या करायच्या असा प्रश्न पडतो.
advertisement
1/7
कुकरमध्ये भात शिजवताना किती शिट्ट्या कराव्या? सरसकट 3 तर नाहीच, मग किती?
कुकरमध्ये पदार्थ झटपट तयार होतात. विशेषत: आता भात बनवण्यासाठी शक्यतो बरेच लोक कुकर वापरतात. काही शिट्ट्यांमध्ये भात तयार होतो. पण मग परफेक्ट भातासाठी कुकरला किती शिट्ट्या करायच्या  2, 3 की 4?
advertisement
2/7
बासमती तांदूळ असेल तर 1 कप बासमती तांदू, दीड कप पाणी आणि 1 ते 2 शिट्ट्या. यापेक्षा जास्त शिट्ट्या दिल्या तर भात चिकट होतो.
advertisement
3/7
कोलम, सुरती किंवा उकडा तांदूळ हा घट्ट असतो. त्यामुळे एक कप तांदळासाठी अडीच कप पाणी आणि 4-5 शिट्ट्या करा.
advertisement
4/7
ब्राऊन राइस असेल तर तो शिजायला वेळ घेतो. एक कप तांदूळ 3 कप पाणी असं प्रमाण ठेवून 6 ते 7 शिट्ट्या करा.
advertisement
5/7
कुकर मोठा असेल तर एक शिट्टी वाढू शकते. तांदूळ भिजवून भात करणार असाल तर एक शिट्टी कमी करा. पाण्याचं प्रमाण कमी-जास्त केलं तरी शिट्ट्या बदलतात.
advertisement
6/7
साधा पांढरा तांदूळ असेल तर एक कप तांदूळ, 2 कप पाणी आणि 2 ते 3 शिट्ट्या करा. भात मऊ आणि मोकळा होतो.
advertisement
7/7
कुकर वापरण्याबाबत तुमच्याकडे अशा आणखी काही किचन टिप्स किंवा कुकिंग टिप्स असतील तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : कुकरमध्ये भात शिजवताना किती शिट्ट्या कराव्या? सरसकट 3 तर नाहीच, मग किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल