Kitchen Tips : गॅसच्या निळ्या आणि पिवळ्या फ्लेमचे कारण काय? गॅसची बचत करण्यासाठी खास टिप्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What is reason for blue and yellow gas flames : आपण घरात गॅस वापरतो. त्याच्या फ्लेमचा रंग बऱ्याचदा आपल्याला बदलताना दिसतो. पण आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. काहीवेळा ते सामान्य असते पण काहीवेळा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. चला पाहूया दोन्ही रंगाच्या फ्लेमचे कारण आणि फरक.
advertisement
1/7

गॅसच्या सामान्यपणे दोन फ्लेम दिसतात, निळी आणि पिवळी. या दोन फ्लेमच्या रंगमागचे नेमके कारण काय आहे, हे आज आपण पाहणार आहोत. चला जाणून घेऊया दोन्हीतील फरक.
advertisement
2/7
गॅसची निळी फ्लेम हे दाखवते की, गॅस आणि हवेचे संतुलन योग्य आहे. या फ्लेमचे तापमान 1960 ते 1980 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते. या फ्लेममध्ये जेवण व्यवस्थित आणि लवकर शिजते.
advertisement
3/7
निळ्या रंगाच्या फ्लेमचा असाही अर्थ होतो की, गॅसची बचत होते आहे. निळ्या रंगाची फ्लेम दर्शवते की, गॅस बर्नरची छिद्रे स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये कोणताही अडथळा नाही.
advertisement
4/7
पिवळी किंवा केशरी रंगाची फ्लेम एक प्रकारचे संकेत असतात. या रंगाची फ्लेम तेव्हा दिसते जेव्हा ऑक्सिजन व्यावस्थित मिळत नाही आणि काहीतरी प्रॉब्लेम असेल. या रंगांच्या फ्लेमचे तापमान 1000 डिग्री सेल्सिअस एवढे असते.
advertisement
5/7
यामुळे जेवण उशिरा शिजते आणि गॅस जास्त वापरला जातो. अशा अर्धवट जाळलेल्या गॅसमुळे भांडी आणि बर्नर काळे होतात. यामुळे कार्बन मोनोऑक्सईडसारखा हानिकारक गॅसही बाहेर पडतो.
advertisement
6/7
या पिवळ्या फ्लेमवर उपायही आहेत. यासाठी बर्नर काढून स्वच्छ करावे. छिद्रे मोकळी होऊ द्या आणि पूर्णपणे सुकवुनच परत वापरा. यानंतरही समस्या येत असतील तर रेग्युलेटर आणि पाईपच्या तपासणीसाठी एक्स्पर्टची मदत घ्या.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : गॅसच्या निळ्या आणि पिवळ्या फ्लेमचे कारण काय? गॅसची बचत करण्यासाठी खास टिप्स