शिळफाट्याची वाहतूक कोंडी विसरा! कल्याण-तळोजा मेट्रोचं काम सुसाट; मेट्रो 12 बाबत महत्त्वाची अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मेट्रो लाईन १२ चा २०० वा यू-गर्डर गोलवली स्थानकाजवळ यशस्वीपणे उभारला गेला. कल्याण ते तळोजा मार्गिका २३.५७ किमी असून १९ उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
1/5

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'मेट्रो लाईन १२' (ऑरेंज लाईन) बाबत एक मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. कल्याण ते तळोजा या मार्गावर मेट्रोचे काम सुसाट सुरू असून, नुकताच या प्रकल्पातील २०० वा 'यू-गर्डर' गोलवली स्थानकाजवळ यशस्वीपणे उभारण्यात आला आहे.
advertisement
2/5
यामुळे या प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ही मेट्रो मार्गिका २३.५७ किमी लांबीची असून यामध्ये एकूण १९ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही मेट्रो कल्याण-डोंबिवली परिसराला थेट नवी मुंबई आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे.
advertisement
3/5
कल्याण-शिळफाटा मार्गावरील भीषण वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी ही मेट्रो मोठा आधार ठरणार आहे. मेट्रो १२ केवळ एक मार्गिका नसून ती अनेक मार्गांचा दुवा ठरणार आहे. कल्याण स्थानकात 'मेट्रो लाईन ५' आणि मध्य रेल्वेच्या 'कल्याण जंक्शन'शी कनेक्टिव्हिटी मिळेल.
advertisement
4/5
हेदुतणे स्थानकात मेट्रो लाईन १४' ला जोडले जाता येईल. अमांडूट स्थानकाला नवी मुंबई मेट्रो लाईन २ शी थेट जोडणी मिळेल. ही संपूर्ण मार्गिका उन्नत (Elevated) असून ती ७ किमी लांबीच्या उड्डाणपुलालाही जोडली जाणार आहे.
advertisement
5/5
यामुळे कल्याण ते तळोजा हा तासनतास चालणारा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. एमएमआरडीएने (MMRDA) कामाचा वेग वाढवला असून, लवकरच या भागाचा चेहरामोहरा बदललेला पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
शिळफाट्याची वाहतूक कोंडी विसरा! कल्याण-तळोजा मेट्रोचं काम सुसाट; मेट्रो 12 बाबत महत्त्वाची अपडेट