Priyanka Chopra : काम करताना मला धरलं...! 'देसी गर्ल'ने सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं खरं कारण, तब्बल 6 वर्षांनी प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Priyanaka Chopra : देसी गर्ल म्हणून ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'वाराणसी'च्या माध्यमातून आता भारतीय सिनेसृष्टीत परतत आहे. पण गेली काही वर्षे ती बॉलिवूडपासून दूर का झाली, यामागील खरं कारण तिने आता सांगितलं आहे.
advertisement
1/4

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जिला देसी गर्ल म्हणतात. तिने 2003 आलेल्या 'द हीरो- लव स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात ती सेकंड लीड भूमिकेत होती. यानंतर 'एतराज', 'सलाम ए इश्क', 'फॅशन', 'बर्फी', मेरी कॉम',' बाजीराव मस्तानी' यासारख्या फिल्ममध्ये काम केलं आणि तिच्या करिअरचा आलेख उंचावला.
advertisement
2/4
पण यशाच्या शिखरावर असताना प्रियांकाने बॉलिवूड सोडलं आणि हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रिपोर्टनुसार 2019 पासून प्रियांकाने कोणत्याही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही. याचं कारण अनेकांना निकशी लग्नानंतर ती अमेरिकेत सेटल झाली म्हणून असावी असं वाटत असेल.
advertisement
3/4
डिसेंबर 2018 मध्ये प्रियांकाने निक जोनसशी लग्न केलं. लग्नानंतर ती अमेरिकेत सेटल झाली. त्यामुळे ती बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली असं अनेकांना वाटत असेल. पण खरं कारण मात्र वेगळंच आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे.
advertisement
4/4
प्रियांका म्हणाली, "मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं. पण हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला रोखून धरल्यासारखं, थांबवल्यासारखं वाटत होतं. एक कलाकार म्हणून मी चांगल्या संधीच्या शोधात होते. त्यानंतर मग मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Priyanka Chopra : काम करताना मला धरलं...! 'देसी गर्ल'ने सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं खरं कारण, तब्बल 6 वर्षांनी प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा