TRENDING:

घरात तुळस आहे? मग 'या' गोष्टी माहित असायलाच हव्या! तरच होईल फायदा

Last Updated:
तुळस ही औषधी वनस्पती विविध आजारांवर अत्यंत रामबाण आहे. तुळशीची नुसती पानं तोडून खाणंही शरिरासाठी फायदेशीर ठरतं. या पानांसह तुळशीच्या बीजाचे उपयोगही अनेक आहेत.
advertisement
1/6
घरात तुळस आहे? मग 'या' गोष्टी माहित असायलाच हव्या! तरच होईल फायदा
तुळशीला आयुर्वेदासह धार्मिकदृष्ट्याही प्रचंड महत्त्व आहे. पौराणिक काळापासून घरोघरी तुळशीची पूजा केली जाते. शिवाय आयुर्वेदातही तुळस गुणकारी मानली जाते.
advertisement
2/6
अँटीफंगल अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. विविध आजारांवर ती गुणकारी मानली जाते.
advertisement
3/6
हिवाळ्यात तर तुळशीचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. यात असलेलं यूजेनॉल अनेक लहान-मोठ्या आजारांपासून शरिराचं संरक्षण करतं.
advertisement
4/6
तुळशीची पानं सर्वाधिक औषधी मानली जातात. त्याचबरोबर तुळशीचं बीजही फायदेशीर असतं. तुळशीच्या पानांची पावडर खाल्ल्यास पचनसंस्थेचं कार्य सुरळीत होतं, शिवाय यामुळे भूकही वाढते आणि रक्त शुद्ध होण्यासही मदत मिळते.
advertisement
5/6
तुळशीची पानं तापावरही गुणकारी असतात, शिवाय हृदयासंबंधित आजार आणि पोटाचे विकारही या पानांमुळे बरे होण्यास मदत मिळते. घश्याची खवखवही दूर होते.
advertisement
6/6
तुळशीची पानं अँटीबायोटिक गुणांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच या पानांमुळे रक्तातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत मिळते. तुळशीची पानं पाण्यात उकळवून खाण्याचा सल्ला दिला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
घरात तुळस आहे? मग 'या' गोष्टी माहित असायलाच हव्या! तरच होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल