TRENDING:

Makar Sankrant 2024 : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? पाहा वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं

Last Updated:
प्रत्येक सणाच्या काही ठरलेल्या धार्मिक विधी आणि परंपरा आहेत. यात त्यात्या सणाचा किंवा उत्सवाचा पोशाख, जेवणाचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो.
advertisement
1/6
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? पाहा वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं
भारतीय संस्कृतीत सर्व सण परंपारिक पद्धतीने आणि अतिशय उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक सणाच्या काही ठरलेल्या धार्मिक विधी आणि परंपरा आहेत. यात त्यात्या सणाचा किंवा उत्सवाचा पोशाख, जेवणाचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो. आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा <a href="https://news18marathi.com/tag/makar-sankranti/">मकर संक्रांत हा पहिला सण</a> आहे.
advertisement
2/6
अनेक ठिकाणी पीक कापणी चांगली व्हावी, अधिक समृद्धी यावी यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. देशात काही ठिकाणी विशेषत: उत्तर भारतात मकर संक्रांतीला जसं <a href="https://news18marathi.com/web-stories/lifestyle/makar-sankranti-special-ukhane-in-marathi-2024-mhpp-1416637/">मराठी उखाणे</a> घेण्याची परंपरा तसंच काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे.
advertisement
3/6
हिंदू धर्मात कोणत्याही सणाला किंवा शुभ कार्यासाठी काळा रंग अशुभ मानला जातो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊया. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत.
advertisement
4/6
काळे कपडे का घातले जातात : ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांती म्हटले जाते. सौर दिनदर्शिकेनुसार सूर्याच्या राशी परिवर्तानाच्या दिवसाला सोल्स्टिस म्हणजेच मकर संक्रांती असे म्हटले जाते.
advertisement
5/6
या दिवसाला उत्तरायण देखील म्हटले जाते. हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे.
advertisement
6/6
हे आहे वैज्ञानिक कारण : मकर संक्रांती हा सोल्स्टिसचा शेवटचा दिवस असल्याने तो हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे. कारण इतर रंगांच्या तुलनेत काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Makar Sankrant 2024 : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? पाहा वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल