सर आणि मॅडम सहज म्हणतो, पण 99 टक्के लोकांना माहिती नाही नेमका अर्थ?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आपण रोज बोलताना एखाद्या वेळी तरी सर किंवा मॅडम म्हणतो. अगदी शाळेतल्या शिक्षकांपासून ते बँकेतल्या कर्मचाऱ्यांपर्यंत बऱ्याच जणांसाठी हे शब्द वापरले जातात. स्त्री असेल तर मॅडम व पुरुष असेल तर आपण सर म्हणतो. हे शब्द आपल्या भाषेचे अविभाज्य भाग झाले आहेत; पण हे शब्द नेमके कुठून आले? या शब्दांचे अर्थ काय? त्यांची उत्पत्ती कुठे झाली? त्यांचं मूळ नेमकं कोणत्या देशात आहे, याबद्दल अनेकांना माहिती नाही. आज आपण या दोन्ही शब्दांमागचा इतिहास जाणून घेणार आहोत. हे कोणत्या मूळ शब्दांपासून आले आणि त्यांचा अपभ्रंश होऊन ते कसे दैनंदिन जीवनात वापरले जाऊ लागले ते पाहू या.
advertisement
1/7

आपण रोज बोलताना एखाद्या वेळी तरी सर किंवा मॅडम म्हणतो. अगदी शाळेतल्या शिक्षकांपासून ते बँकेतल्या कर्मचाऱ्यांपर्यंत बऱ्याच जणांसाठी हे शब्द वापरले जातात. स्त्री असेल तर मॅडम व पुरुष असेल तर आपण सर म्हणतो.
advertisement
2/7
आदरणीय व्यक्ती किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावापुढे सर हा शब्द जोडला जातो. मराठीत श्री म्हटलं जातं, काहीसा त्याच प्रमाणे हा शब्दही वापरला जातो. दैनंदिन जीवनात प्रत्येक जण रोज एकदा तरी सर म्हणत असेलच. सर्वांच्या तोंडी वसलेला हा सर शब्द कुठून आला असा प्रश्न अनेकदा पडतो.
advertisement
3/7
एखाद्या सीनिअरला मान देण्यासाठी किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीचा आदर करण्यासाठी वापरला जाणारा सर हा शब्द 'सायर' या फ्रेंच शब्दावरून आला आहे.
advertisement
4/7
या शब्दाचा उपयोग एखाद्या बड्या पुरुषाला संबोधण्यासाठी केला जातो. एके काळी सर ही राजकीय आणि मुत्सद्दी कारणांसाठी दिली जाणारी सन्माननीय पदवी होती. ती ब्रिटिश राजवटीत मोजक्याच भारतीयांना दिली गेली होती.
advertisement
5/7
'मॅडम' शब्दाबद्दल बोलायचं झाल्यास, सर म्हणून पुरुषांना मान दिला जातो, त्याप्रमाणे स्त्रीला मान देण्याच्या उद्देशाने वापरला जातो.
advertisement
6/7
कॉलिन्स डिक्शनरीनुसार मॅडम हा शब्द 'माय डेम' या शब्दापासून तयार झाला आहे. डेम हा शब्द लॅटिन डोमिना शब्दापासून आला आहे. तो डोमिनसचं स्त्रीलिंगी रूप आहे
advertisement
7/7
त्याचा अर्थ लॉर्ड किंवा मास्टर असा होतो; पण आता डेम हा शब्द आक्षेपार्ह मानला जातो. एके काळी डेम हा शब्द विवाहित स्त्री किंवा जबाबदार पदावर असलेल्या स्त्रीसाठी वापरला जायचा. आता त्याऐवजी मॅडम हा शब्द वापरला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सर आणि मॅडम सहज म्हणतो, पण 99 टक्के लोकांना माहिती नाही नेमका अर्थ?