Medicine Price Rise : इराण-इस्त्रायल युद्धामुळं औषधं महागणार? पॅरासिटामॉलचे खरंच वाढणार भाव?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Medicine Prices : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जगभरातील अर्थव्यवस्थांवर होऊ लागला आहे. भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रावर देखील या युद्धाचा परिणाम होत असून औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
1/9

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. कच्च्या मालाच्या वाढत असल्याने उत्पादन खर्चात अचानक वाढ झाली आहे. याबाबत औषध उत्पादन कंपन्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
2/9
ही परिस्थिती अशीच राहिली, तर देशात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. औषध मिळण्यास विलंब देखील होऊ शकतो. असं झाल्यास औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच उपचारांचा खर्च देखील महाग होऊ कतो. या सर्वांचाथेट परिणाम सर्वसामांन्यांच्या खिशावर होणार आहे.
advertisement
3/9
तज्ञांकडून सर्वात मोठी चिंता ही रोजच्या वापरातील अत्यावश्यक औषधांबद्दल व्यक्त केली जात आहे. ताप, संसर्गजन्य आजार, मधुमेह आणि हृदयरोगावरील उपचारासाठी वापरले जाणाऱ्या औषधांवर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. औषध उद्योगातील काही जाणकारांच्या मते, हे युद्ध आणखी काही काळ सुरु राहिले आणि किमती वाढत गेल्या तर औषध उत्पादन कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवणं अवघड जाऊ शकतं.
advertisement
4/9
पॅरासिटामॉलसारखं प्रत्येक घरात वापरलं जाणारं सामान्य औषध देखील या तणावात महागण्याची आणि आवश्यक पुरवठा न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही अशीच परिस्थिती राहिल्यास अँटीबायोटिक्स, मधुमेह आणि हृदयाच्या औषधांच्या बाबतीतही हेच घडू शकतं. असं झाल्यास रुग्णांना त्यांची औषधं बदलावी लागू शकतात किंवा औषधांचे डोस चुकवावे लागू शकतात.
advertisement
5/9
औषधनिर्माण उद्योगातील जाणकारांच्या मते, अॅक्टिव फार्मास्युटिकल इंग्रीडिएन्ट्स, सॉल्वेन्ट्स आणि इतर अत्यावश्यक पदार्थांच्या किमती केवळ 15 दिवसांत 200 ते 300 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या निर्मितीचा खर्चही जवळपास दुप्पट झाला असून ते प्रति किलो सुमारे 250 रुपयांवरून 450 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळं भविष्यात पॅरासिटामॉलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
6/9
पॅरासिटामॉलसह इतर अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण अशते. या औषधांच्या किमती आधीच निश्चित केलेल्या असतात. त्यामुळं कच्च्या मालाचा खर्च वाढूनही कंपन्यांना किमती वाढता येत नाही. असं झाल्यास कंपन्यांना उत्पादन चालू ठेवणं कठीण होईल.
advertisement
7/9
कच्चा मालच नाही तर पॅकेजिंगचा खर्चही वेगाने वाढत आहे. औषधांच्या पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे ॲल्युमिनियम फॉइल, प्लास्टिक आणि काचेचे कंटेनर देखील महाग झाले आहेत. हे घटक औषधांच्या सुरक्षिततेसाठी आणि साठवणुकीसाठी आवश्यक असतात. त्यामुळं याकडं देखील दुर्लक्ष करता येऊ शकत नाही.
advertisement
8/9
औषध उत्पादन कंपन्या साधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा साठा ठेवतात. परंतु हे युद्ध अजून किती काळ चालणार हे सांगणं कठी आहे. यामुळं सर्वच बाबतीत अनिश्चितता वाढत चालली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या औषध उत्पादक कंपन्यांना याचा मोठा फटका बसत आहे. कमी नफ्यावर चालणाऱ्या आणि परवडणाऱ्या औषधांच्या पुरवठा करणाऱ्या अनेक छोट्या कंपन्या वाढत्या खर्चामुळं उत्पादन कमी करण्याचा किंवा काही औषधांचं उत्पादन बंद करण्याचा विचार करत आहेत.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Medicine Price Rise : इराण-इस्त्रायल युद्धामुळं औषधं महागणार? पॅरासिटामॉलचे खरंच वाढणार भाव?