TRENDING:

Mother's Day Gift Idea : मदर्स डेला आईला द्या अनोखं गिफ्ट; 'या' वस्तू पाहून मनापासून होईल खुश!

Last Updated:
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 12 मे रोजी मदर्स डे आहे. आपण सर्वजण या दिवशी आईसाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असतो. गिफ्टदेखील त्यातीलच एक. पण आईला कोणती अशी वस्तू द्यावी, जी खूप खास असेल? आज आम्ही तुम्हाला काही छान पर्याय यासाठी सुचवणार आहोत.
advertisement
1/7
मदर्स डेला आईला द्या अनोखं गिफ्ट; 'या' वस्तू पाहून मनापासून होईल खुश!
गिफ्ट देणे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. मदर्स डेच्या दिवशी, तुम्हाला तुमच्या आईचे प्रेम आणि काळजीबद्दल आभार मानायचे असतील आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहायचे असेल, तर एक छान डेट प्लॅन करा आणि एकत्र कुठेतरी जा. या खास दिवशी तुम्ही आईला तुमचा वेळ दिला तर तिला नक्कीच आनंद होईल.
advertisement
2/7
आजकाल कस्टमाइज भेटवस्तू अगदी सहज बनवता येतात. अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत, ज्या विविध प्रकारचे कस्टमाइज दिवे, फोटो फ्रेम इत्यादी बनवतात. तुम्ही येथून तुमच्या आईच्या नावाने गिफ्ट मागवू शकता. आई तुम्ही दिलेली ही भेट तिच्या खोलीत सजवून ठेवेल. (Photo : Amazon)
advertisement
3/7
मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईसाठी खास कप देखील खरेदी करू शकता. असे कप ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत. जर तुमच्या आईला चहा आणि कॉफी आवडत असेल तर ही भेट तिच्यासाठी योग्य राहील. (Photo : Amazon)
advertisement
4/7
प्रत्येक स्त्रीला दागिने आवडतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचे कोणतेही दागिने किंवा ज्वेलरी बॉक्स दिल्यास तिच्या चेहऱ्यावर नक्कीच एक सुंदर हास्य उमटेल. तुमच्या आईच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे दागिने खरेदी करा. (Photo : Amazon)
advertisement
5/7
मातांना फोन घेऊन जाण्यात खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासाठी मोबाईल कॅरी करता येईल अशा पर्स खरेदी करू शकता. ही पर्स त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. (Photo : Amazon)
advertisement
6/7
किचन ऑर्गनायझर देखील आईसाठी एक चांगली भेट आहे. स्वयंपाकघरात स्टोरेजची जागा कमी असल्यास तुमच्या गरजेनुसार एक चांगला किचन ऑर्गनायझर खरेदी करा. किचनची इतर काही साहित्य घेऊनही तुम्ही आईला भेट म्हणून देऊ शकता. (Photo : Amazon)
advertisement
7/7
तुम्हाला तुमच्या आईसाठी काही खास विकत घ्यायचे असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे परफ्यूम खरेदी करून गिफ्ट करू शकता. आजकाल ते अनेक सुंदर पॅकेजिंगमध्ये ऑनलाइन देखील उपलब्ध आहे. तुम्ही ते विकत घ्या आणि तुमच्या आईला प्रेमाने द्या. (Photo : Amazon)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mother's Day Gift Idea : मदर्स डेला आईला द्या अनोखं गिफ्ट; 'या' वस्तू पाहून मनापासून होईल खुश!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल