Actress Shocking Life : 7 वेळा जीव देण्याचा प्रयत्न, पतीच्या नातेवाईकाने केली काळी जादू, अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Mohini Shocking Incidence : अभिनेत्रीने सांगितलं की, ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिने तब्बल ७ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
advertisement
1/9

मुंबई: ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनी आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील काही धक्कादायक आणि भयानक अनुभव सांगितले आहेत.
advertisement
2/9
मोहिनीने सांगितलं की, ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिने तब्बल ७ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
advertisement
3/9
मोहिनीने ‘सिनेमा विकटन’ या मुलाखतीत सांगितलं की, लग्नानंतर तिचं आयुष्य खूप आनंदी होतं. पती आणि मुलांसोबत ती सुखी जीवन जगत होती. पण, अचानक तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं.
advertisement
4/9
मोहिनी म्हणाली, “कोणत्याही विशिष्ट कारणामुळे नाही, पण माझ्या मनावर एक विचित्र ओझं होतं. त्या वेळी मी एकापाठोपाठ एक ७ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.”
advertisement
5/9
मोहिनीने पुढे सांगितलं, “मी असं का करत आहे, हे मलाच कळत नव्हतं. त्यावेळी एका ज्योतिषाने मला सांगितलं की, माझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे.” सुरुवातीला तिने यावर विश्वास ठेवला नाही, पण नंतर तिला स्वतःलाच प्रश्न पडला की, ‘मी असं का करत आहे?’
advertisement
6/9
मोहिनी म्हणाली, “नंतर मला समजलं की, माझ्या पतीच्या एका महिला नातेवाईकाने माझ्यावर ही काळी जादू केली होती आणि त्यामुळेच माझी ही अवस्था झाली होती.”
advertisement
7/9
मोहिनीने सांगितलं की, या सगळ्यामधून तिला फक्त येशूने बाहेर काढलं. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली मोहिनी, २००६ मध्ये ख्रिश्चन धर्मात आली होती.
advertisement
8/9
ती म्हणाली, “माझी विचार करण्याची शक्ती फक्त मरणापर्यंत मर्यादित झाली होती. माझ्याकडे सगळं काही असूनही माझ्यासोबत असं का होत आहे, याचाच मी विचार करत होते. पण, माझ्या विश्वासामुळे मला नवं जीवन मिळालं.”
advertisement
9/9
मोहिनीने आतापर्यंत मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदीत तिने अक्षय कुमारसोबत ‘डान्सर’ या चित्रपटातही काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Shocking Life : 7 वेळा जीव देण्याचा प्रयत्न, पतीच्या नातेवाईकाने केली काळी जादू, अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा