TRENDING:

Kumar Sanu : कुनिकासोबत लिव्ह-इन, मीनाक्षीमुळे मोडलं लग्न, एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलले कुमार सानू

Last Updated:
Kumar Sanu Controversy : ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू त्यांच्या गाण्यांसाठी जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादामुळेही चर्चेत राहिले आहेत.
advertisement
1/7
एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलले कुमार सानू
मुंबई: ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू त्यांच्या गाण्यांसाठी जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादामुळेही चर्चेत राहिले आहेत.
advertisement
2/7
त्यांच्यावर नेहमीच ‘वुमनाइजर’ असल्याचा आणि एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरचा आरोप करण्यात आला होता. आता पहिल्यांदाच कुमार सानूने या सर्व आरोपांवर मौन सोडलं आहे.
advertisement
3/7
कुमार सानू यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं. याच कारणामुळे त्यांचा पहिली पत्नी रीटा भट्टाचार्यसोबतचा घटस्फोट झाला, असा आरोप होता.
advertisement
4/7
यावर कुमार सानू यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, “मीनाक्षी शेषाद्रीसोबत माझ्या अफेअरच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मी तिला कधीच भेटलो नाही.”
advertisement
5/7
कुमार सानू यांनी त्यांच्यावर लागलेल्या ‘वुमनाइजर’ असल्याच्या आरोपांवरही उत्तर दिलं. ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात खूप वेळा ऐकलं आहे की, मी वुमनाइजर आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी. पण, तुम्ही समजून घ्या, मी सलोनीसोबत दुसऱ्यांदा लग्न करून २३ वर्षं झाली आहेत. या २३ वर्षांत तुम्ही कुण्या दुसऱ्या स्त्रीचं नाव माझ्यासोबत जोडलेलं ऐकलं आहे का?”
advertisement
6/7
ते पुढे म्हणाले, “जर मी खरंच तसा माणूस असतो, तर माझ्या दुसऱ्या लग्नातही अशा चर्चा नक्कीच झाल्या असत्या. पण, या फक्त अफवा होत्या.”
advertisement
7/7
कुमार सानूने रीटा भट्टाचार्यसोबत घटस्फोट घेतल्यावर, १९९४ मध्ये सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kumar Sanu : कुनिकासोबत लिव्ह-इन, मीनाक्षीमुळे मोडलं लग्न, एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलले कुमार सानू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल