TRENDING:

Mustard Oil Health Benefits: मोहरीच्या तेलाचे आहेत इतके फायदे, नियमित वापराने दूर पळतील अनेक आजार

Last Updated:
Health benefits of Mustard Oil: आपल्यापैकी अनेकांच्या स्वयंपाकघरात मोहरीचं तेलाचा वापर वर्षांनुवर्ष होतोय. हिंदीमध्ये याला सरसों का तेल म्हटलं मोहरीच्या तेलाच्या वापाराने खाद्यपदार्थांना एक वेगळीच चव येते. मात्र मोहरीच्या तेलाचा वापर हा फक्त चवीपुरता किंवा खाद्यपदार्थ तयार करण्याकरता मर्यादित नसून मोहरीच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. जाणून घेऊयात मोहरीच्या तेलाचे फायदे.
advertisement
1/7
Mustard oil benefits: मोहरीच्या तेलाचे आहेत इतके फायदे, दूर पळतील अनेक आजार
मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ॲसिड, व्हिटामिन ई, अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. याशिवाय मोहरीच्या तेलात टोटल लिपिड फॅट्सह अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.
advertisement
2/7
सांधेदुखी, हाडांच्या दुखण्यावर मोहरीचं तेल फायद्याचं आहे. मोहरीच्या तेलात ओमेगा- 3 फॅटी ॲसिड्स असतात. त्यामुळे मोहरीच्या तेलाने नियमित मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
advertisement
3/7
मोहरीच्या तेलाने शरीरातील उष्णात वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसात उत्तर भारतात मोहरीच्या तेलाचा वापर अन्नात मोठ्या प्रमाणात केला जातो. थंडीत मोहरीच्या तेलाने मॉलिश केल्यास शरीर उबदार राहायला मदत होते.
advertisement
4/7
त्वचेसाठी मोहरीचं खूप फायद्याचं आहे. मोहरीच्या तेलामध्ये असणाऱ्या औषधी पोषकतत्त्वांमुळे त्वचेचा ओलावा टिकून राहून त्वचा तजेलदार बनते.याशिवाय त्वचेवर सुरकुत्याही येत नाही.
advertisement
5/7
मोहरीच्या तेलात असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्समुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातल्या वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन हृदयाचं आरोग्य सुधारतं.
advertisement
6/7
बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांच्या वाढीसाठी आणि कोंड्याच्या समस्येवर मोहरीचं तेल अतिशय फायदेशीर ठरतं.
advertisement
7/7
मोहरीचं तेल डास आणि किटकांना पळवून लावण्यासाठीही फायद्याच ठरतं. मोहरीच्या तेलाच्या वासाने एडीज एल्बोपिक्टस प्रकारातले डार दूर पळतात. त्यामुळे मोहरीचं तेल हे नैसर्गिक किटकनाशक ठरतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mustard Oil Health Benefits: मोहरीच्या तेलाचे आहेत इतके फायदे, नियमित वापराने दूर पळतील अनेक आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल