TRENDING:

Dates Benefits: हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने होतील इतके फायदे; मेंदू राहील तरतरीत, हाडं राहतील ठणठणीत

Last Updated:
Health Benefits of eating Dates in Winter: सुकामेव्यात अनेक पोषकतत्वे असतात त्यामुळे हिवाळ्यात सुकामेवा खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा ठरतो. खजूर हा सुकामेव्याचा एक भाग आहे. खजूर हा ओला आणि सुकलेल्या (खारकांच्या) स्वरूपातही खाता येतो. जाणून घेऊयात हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे.
advertisement
1/7
Dates Benefits: हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने होतील 'इतके' फायदे, मेंदू राहील तरतरीत
खजुरात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
2/7
Dates Benefits: हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने होतील 'इतके' फायदे, मेंदू राहील तरतरीत
खजुरात असलेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीरला चांगली उर्जा मिळून थंडीपासून बचाव होऊ शकतो. दररोज उठल्यावर 2-3 भिजवलेले खजूर खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
3/7
थंडीत अनेकांना दम्याचा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. जर तुम्हाला पण दम्याचा त्रास होत असेल तर भिजवलेले खजूर खाल्लेत तर तुम्हाला श्वसनरोगांपासून आराम मिळेल.
advertisement
4/7
खजुरांत असलेलं तांबं, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात. त्यामुळे हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
advertisement
5/7
तुम्हाला जर अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सकाळी उठल्यावर खजूर खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. खजुरांमध्ये असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. खजूर थेट खाण्यापेक्षा रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उठल्यास जास्त गुणकारी ठरतं.
advertisement
6/7
खजुरांमध्ये असेलल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीजचा पुरवठा होता. त्यामुळे तुम्ही जर वजन वाढवायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खजुराइतका फायदेशीर सुकामेवा दुसरा कोणता नाही.
advertisement
7/7
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. खजूर खाण्याचे मेंदूंचं आरोग्यही सुधारायला मदत होते. सकाळी उपाशी पोटी 2 खजूर खाल्ले तर त्याचे दुप्पट फायदे होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dates Benefits: हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने होतील इतके फायदे; मेंदू राहील तरतरीत, हाडं राहतील ठणठणीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल