संतोष देशमुख आणि प्रकरणातील आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत परंतु कारागृह आता नव्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.. कारागृहाच्या परिसरात 50 ते 60 वर्षांपूर्वीची मोठी वृक्ष कारागृह प्रशासनाने अचानक तोडून विकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री अजित दादा असलेल्या बीड जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असलेले ते वाढवण्यासाठी एकाच दिवशी 30 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम करण्यात आला.
advertisement
एकीकडे प्रशासन वृक्ष लागवडीसाठी आग्रही असताना दुसरीकडे मात्र मध्यवर्ती कारागृहातच अनेक दशक उभी असलेली झाड तोडली आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत
विशेष वृक्ष तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी न घेता या वृक्षावर कुऱ्हाड चालवण्यात आली. तर जेल प्रशासनाला विचारण्यासाठी गेलेला सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना अरेरावीच्या भाषा करण्यात आली. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनधिकृत वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला आहे.
कारागृहाचे जेलर वादाच्या भोवऱ्यात
ऐन गणेश विसर्जनाच्या सुट्टीच्या दिवशी कारागृह परिसरातील महाकाय झाडे तोडण्यात आली यामुळे वृक्षप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बीड जिल्हा कारागृहाचे जेलर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.. संबंधित प्रकरणातील चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
हवामान बदल, वाढते प्रदूषण, पाण्याची टंचाई यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे. बीड जिल्ह्याने एकाच दिवशी 30 लाखांहून अधिक रोपांची लागवड करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हरित बीड अभियानात सहभागींचे कौतुक केले. या रोपांचे संवर्धन, संगोपनाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. जिल्हा प्रशासनाने वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन हरित बीड अभियानाचा संकल्प पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
हे ही वाचा :
ज्याच्या फोनमुळे अजितदादांनी महिला अधिकाऱ्याला झापलं, त्या बाबा जगतापचा खळबळजनक व्हिडीओ समोर