Lakshadweep : लक्षद्वीपला जाण्याच प्लॅनिंग करताय? मग सोबत ठेवा 'ही' कागदपत्र, नाहीतर एंट्री मिळणार नाही
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप बेटाला भेट दिल्यानंतर लक्षद्वीप प्रसिद्धी झोतात आले आहे. मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांची आणि भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवल्यानंतर अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीपकडे पाठ फिरवून लक्षद्वीपकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. अनेकजण लक्षद्वीपला जाण्याचं प्लॅनिंग करीत आहेत असे असतानाच लक्षद्वीप ट्रिपला जाण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

मालदीवच्या अगदी उत्तरेला आणि भारताच्या मुख्य भूमीपासून 400 किलोमीटर पश्चिमेला वसलेले लक्षद्वीप हे नैसर्गिक सौंदर्य, मूळ समुद्रकिनारे आणि विदेशी सागरी जीवन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. ज्यामुळे हे ठिकाण पर्यटनासाठी एक उत्तम पर्यटनस्थळ बनले आहे.
advertisement
2/5
लक्षद्वीप येथे 36 लहान मोठे बेट असून हे ठिकाण खजूर, नारळाची झाड आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते. लक्षद्वीपमधील 36 बेटांपैकी 6 बेटांवर फक्त भारतीय पर्यटकांना तर 2 बेटांवर परदेशी पर्यटकांना येण्याची परवानगी आहे. लक्षद्वीप बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 50 हजारांपासून सुरु होतात.
advertisement
3/5
लक्षद्वीप हा जरी भारताचा केंद्रशासित प्रदेश असला तरी याला भेट देण्यापूर्वी प्रोटेक्टेड एरिया परमिट घेणे गरजेचे आहे. या बेटांचे मूळ रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने या बेटांवर प्रवेश करण्यापूर्वी आणि राहण्यापूर्वी एरिया परमिट घेणे आवश्यक आहे. केवळ बेटावर काम करणारे सरकारी आणि लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाला एरिया परमिट घेण्याची आवश्यकता नसते.
advertisement
4/5
लक्षद्वीप बेटावर तुम्ही हवाई मार्ग किंवा जलमार्गाने देखील जाऊ शकता. परंतु त्यापूर्वी बेटावर जाण्याचे एंट्री परमीट घेणे महत्वाचे आहे. लक्षद्वीपमधील काही बेट ही तेथील संवेदनशील पर्यावरणामुळे प्रतिबंधित म्हणून नियुक्त केली आहेत. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना अशा बेटांवर जाण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र परवाना म्हणजेच रेस्ट्रिक्टेड एरिया परमीट घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
लक्षद्वीपचा एंट्री परमीट फॉर्म हा ऑनलाईन उपलब्ध असून तुम्ही तो प्रशासनाकडे सबमिट करणे महत्वाचे आहे. एंट्री परमीट फॉर्म भरण्यासाठी प्रति फॉर्म 50 रुपये इतके शुल्क आकारले जाते. तसेच भारतातून लक्षद्वीपला भेट देणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तांनी जारी केलेले पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. तसेच अर्जदारांनी यासोबत स्वतःच्या ओळखपत्राच्या तीन झेरॉक्स आणि तीन पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे. परमीट जाहीर झाल्यावर पर्यटक लक्षद्वीपला भेट देऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lakshadweep : लक्षद्वीपला जाण्याच प्लॅनिंग करताय? मग सोबत ठेवा 'ही' कागदपत्र, नाहीतर एंट्री मिळणार नाही