Rum Cake : रम केकमध्ये कोणती रम असते? आणि हा केक खरंच वेज असतो का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
केकची चव, सुगंध आणि मऊ टेक्स्चर लोकांना आकर्षित करतात. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की या केकमध्ये नेमकी कोणती रम वापरतात? आणि हा केक वेज मानला जातो का?
advertisement
1/6

सणासुदीच्या काळात किंवा खास पार्ट्यांमध्ये रम केकची चर्चा नेहमीच होते. आता तर ख्रिसमस ही जवळ येतोय त्यामुळे या काळात केक, रम केक, प्लम केक सारखे पदार्थ बाजारात सहजच उपलब्ध असतात आणि ठिकठिकाणी आपल्याला दिसतात देखील.
advertisement
2/6
केकची चव, सुगंध आणि मऊ टेक्स्चर लोकांना आकर्षित करतात. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की या केकमध्ये नेमकी कोणती रम वापरतात? आणि हा केक वेज मानला जातो का?
advertisement
3/6
रम केकमध्ये कोणत्याही ब्रँडची रम वापरली जाऊ शकते. घरगुती रेसिपीत लोक सामान्यतः डार्क रम पसंत करतात कारण तिचा फ्लेवर केकला छान डेप्थ देतो. मार्केटमध्ये बनणाऱ्या रम केकमध्येही साधारणपणे डार्क रम किंवा गोल्ड रम वापरली जाते. काही बेकरी अल्कोहोल कंटेंट कमी करण्यासाठी रम एसेंसचा वापर करतात, ज्यामुळे चव आणि सुगंध मिळतो पण अल्कोहोल जास्त राहत नाही.
advertisement
4/6
आता मोठा प्रश्न की हा केक वेज असतो का? कारण काही असे लोक ही असतात जे वेजिटेरियन असतात, पण त्यांना दारु चालते. त्यामुळे असे लोक हा केक खाताना थोडा विचार करतात.
advertisement
5/6
तर याचं उत्तर आहे हो, रम केक साधारणपणे वेज असतो. बेकिंग प्रक्रियेत केक जास्त वेळ भाजला जातो, त्यामुळे रममधील बहुतेक अल्कोहोल उडून जातं. उरतो तो फक्त सुगंध आणि हलका फ्लेवर. शिवाय बऱ्याच बेकरी एगलेस रम केकसुद्धा बनवतात, ज्यात अंडे न वापरता मऊ टेक्स्चर तयार केलं जातं. त्यामुळे ज्यांना शाकाहारी पर्याय हवा आहे त्यांच्यासाठीही रम केक उपलब्ध असतो.
advertisement
6/6
अर्थात, जर तुम्ही पूर्णपणे अल्कोहोल टाळत असाल तर ऑर्डर करण्याआधी दुकानात विचारून खात्री करून घ्या. त्यांनी रम एसेंस वापरलं आहे की रिअल रम. पण सामान्यपणे रम केक हा वेज + बेकिंगमध्ये अल्कोहोल जवळपास उडून गेलेला असा पर्याय मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Rum Cake : रम केकमध्ये कोणती रम असते? आणि हा केक खरंच वेज असतो का?