TRENDING:

Non-stick Pan : डोसा बनवताना तव्याला चिकटतोय? कदाचित तुम्ही तवा घासताना 'ही' चूक करताय

Last Updated:
How to clean non-stick pan : "नॉन-स्टिक तवा आहे तरी डोसा का चिकटतोय?" असा प्रश्न मग अनेकदा गृहिणींना पडतो. खरंतर या मागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं. कारण यामध्ये तुम्ही तवा घासताना नकळत अशी चूक करता ज्यामुळे डोसा बरोबर येत नाही.
advertisement
1/6
डोसा बनवताना तव्याला चिकटतोय? कदाचित तुम्ही तवा घासताना 'ही' चूक करताय
सकाळच्या घाईत मस्त कुरकुरीत डोसा खाण्याची इच्छा असते, पण जेव्हा पहिलाच डोसा तव्याला चिकटतो आणि त्याचे तुकडे होतात आणि तो जळतो ज्यामुळे त्याची चव देखील बिघडते. तेव्हा अख्खा मूड जातो. "नॉन-स्टिक तवा आहे तरी डोसा का चिकटतोय?" असा प्रश्न मग अनेकदा गृहिणींना पडतो. खरंतर या मागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं. कारण यामध्ये तुम्ही तवा घासताना नकळत अशी चूक करता ज्यामुळे डोसा बरोबर येत नाही.
advertisement
2/6
नॉन-स्टिक तवा म्हणजे आधुनिक स्वयंपाकघरातील सर्वात सोयीचं साधन. कमी तेल आणि झटपट स्वयंपाक यामुळे तो लोकप्रिय आहे. पण, अनेक घरांमध्ये काही महिन्यांतच या तव्याची 'नॉन-स्टिक' शक्ती संपते. याला कारणीभूत आहे तुमची तवा साफ करण्याची चुकीची पद्धत.
advertisement
3/6
ती सर्वात मोठी चूक कोणती?बहुतेक जण डोसा किंवा पोळी करून झाली की, तवा गरम असतानाच तो नळाखाली धरतात. गरम तव्यावर थंड पाणी टाकणे ही सर्वात मोठी चूक आहे. विज्ञानाच्या भाषेत याला 'थर्मल शॉक' (Thermal Shock) म्हणतात. तवा गरम असताना त्यावर थंड पाणी टाकल्याने धातूवर ताण येतो आणि तव्याचा पृष्ठभाग वाकडा होऊ शकतो. यामुळे तव्यावरील 'टेफ्लॉन कोटिंग' सैल होते आणि कालांतराने डोसे किंवा ऑम्लेट तव्याला चिकटू लागतात.
advertisement
4/6
तवा घासताना 'या' गोष्टी कटाक्षाने पाळा-लोखंडी काथ्या (Steel Scrubber) यामुळे कोटिंगवर ओरखडे पडतात. त्यामुळे नेहमी हा तवा घासताना किंवा साफ करताना मऊ स्पंजचा वापर करा.-स्ट्रॉन्ग डिटर्जंटमुळे कोटिंगचा थर निघतो, त्यामुळे सौम्य लिक्विड सोप पावरा.-तवा पूर्ण थंड होण्याची वाट पहा. तवा हाताला सामान्य लागला की मगच स्वच्छ करा.
advertisement
5/6
तव्याचा 'नॉन-स्टिक' पणा परत मिळवण्यासाठी खास टिप्सजर तुमचा तवा खराब झाला असेल, तर तो फेकून देण्यापूर्वी ही 'ट्रिक' वापरून पहा:1. मिठाचा वापर: तव्यावर थोडे जाडे मीठ टाकून पेपर नॅपकिनने हलके घासून घ्या. यामुळे त्यावरील जळलेला थर निघून जाईल.2. कांद्याची जादू: डोसा करण्यापूर्वी तव्यावर अर्धा कापलेला कांदा तेलात बुडवून फिरवा. यामुळे तव्याला नैसर्गिक 'नॉन-स्टिक' लेअर मिळतो.3. कमी गॅसवर वापर: नॉन-स्टिक तवा कधीही अतिशय मोठ्या फ्लेमवर वापरू नका. जास्त उष्णतेमुळे कोटिंग लवकर जळते.
advertisement
6/6
अनेकदा आपण एकावर एक भांडी रचून ठेवतो. यामुळे खालच्या भांड्याच्या कडांनी वरच्या तव्याचे कोटिंग घासले जाते. तवा ठेवताना त्यावर एक पेपर नॅपकिन ठेवा आणि मगच त्यावर दुसरे भांडे ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Non-stick Pan : डोसा बनवताना तव्याला चिकटतोय? कदाचित तुम्ही तवा घासताना 'ही' चूक करताय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल