श्रावणात उपवास आहे? ‘या’ पद्धतीनं तयार करा भगरीचे आप्पे, पाहा सोपी रेसिपी PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. या काळात उपवासासाठी आपण भगरीचे आप्पे रेसिपी ट्राय करू शकता.
advertisement
1/8

श्रावण हा सण उत्सवांचा महिना आहे. या काळात अनेकजण उपवास करतात. उपवास सुरू झाले की त्यासाठी उपवासाचे पदार्थही आलेच. उपवासाला अनेक जण फोडणीची भगर किंवा साबुदाण्याची उसळ म्हणजे खिचडी बनवतात.
advertisement
2/8
मात्र याव्यतिरिक्त आपण याच साहित्याचा वापर करून वेगळी डिश बनवू शकता. घरच्या साहित्यात भगरीचे आप्पे कसे बनवायचे हे वर्धा येथील गंगाताई लाकडे यांनी सांगितले आहे.
advertisement
3/8
भगरीचे आप्पे बनवण्यासाठी साहित्य : घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून अगदी पंधरा मिनिटात आप्पे तयार होतात. त्यासाठी आपल्याला भगर, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरे, कढीपत्ता, तेल, डाळिंब, सफरचंद हे साहित्य लागणार आहे.
advertisement
4/8
सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन घ्यायची. त्यानंतर त्यात शेंगदाणे घालून भिजू द्यायचे. यामध्ये तुम्हाला आवडीनुसार साबुदाण्याचे पीठ देखील ऍड करू शकता. भगर आणि शेंगदाणे जवळजवळ अर्धा तास भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यात हिरव्या मिरच्या जिरे कढीपत्त्याची पाने आणि अगदी थोडसं पाणी ऍड करून चांगलं बारीक करून घ्यायचं.
advertisement
5/8
बारीक झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यात चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर, डाळिंबाचे दाणे आणि एका सफरचंदाचे बारीक तुकडे करून चांगले एकत्र करून घ्यायचे.
advertisement
6/8
आता हे मिश्रण आप्पे बनविण्यासाठी तयार आहे. आपल्याला आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. त्यात हे मिश्रण भरायचं आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं. एका बाजूने चांगले शिजल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचे आहे पुन्हा झाकून ठेवून चांगले शिजू द्यायचे. पाच दहा मिनिटांनी हे अप्पे खाण्यासाठी तयार होतात.
advertisement
7/8
दह्याची चटणी बनवण्यासाठी तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ आणि त्यात दही ऍड करायचं. हा तडका झाल्यानंतर दह्याची चटणी आप्पेसोबत खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
8/8
जर तुमच्याही घरी उपवास असतील आणि काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असेल तर भगरीचे पंधरा मिनिटात तयार होणारे अप्पे अगदी स्वादिष्ट लागतात. चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे भगरीचे आप्पे तयार होतात. यंदाच्या सणासुदीच्या उपवासांमध्ये तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
श्रावणात उपवास आहे? ‘या’ पद्धतीनं तयार करा भगरीचे आप्पे, पाहा सोपी रेसिपी PHOTOS