Monsoon Recipe : पावसाळा स्पेशल चटपटीत कच्चा चिवडा, पाहताच तोंडाला सुटेल पाणी, एकदा रेसिपी पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पाऊस पडला की, संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. मुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि इतर काही साहित्यापासून हा चिवडा तुम्ही बनवू शकता.
advertisement
1/7

पाऊस पडला की, संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशा वेळी भजी आणि इतर तेलकट पदार्थ आपण बनवतो. पण, यालाच एक पर्याय म्हणून तुम्ही कमीत कमी वेळात तयार होणारा कच्चा चिवडा बनवू शकता.
advertisement
2/7
अगदी वेळेवर हा चिवडा तुम्ही बनवून खाऊ शकता. मुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि इतर काही साहित्यापासून हा चिवडा तुम्ही बनवू शकता. याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
कच्चा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : मुरमुरे, शेव चिवडा, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर, कडीपत्ता, बारीक काप केलेली कैरी, लिंबू, तेल, लाल तिखट, हळद, मीठ, चाट मसाला, धणे पावडर हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
कच्चा चिवडा बनवण्याची कृती : सर्वात आधी एका भांड्यात मुरमुरे टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यात शेव चिवडा टाकून घ्यायचा. त्यानंतर शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर लाल तिखट, चवीपुरते मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर धणे पावडर, हळद आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
advertisement
5/7
मिक्स करून घेतल्यानंतर त्यात थोडं एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचे आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर कैरीचे बारीक काप, कोथिंबीर आणि कडीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
advertisement
6/7
ते मिक्स करून घेतल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
advertisement
7/7
जेवढं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल तेवढाच चिवडा टेस्टी बनतो. याला हेल्दी बनवण्यासाठी आणखी काही भाज्या तुम्ही यात मिक्स करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पिठी साखर सुद्धा टाकून घेऊ शकता. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात कांदा आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे चिवडा लवकर नरम पडणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Monsoon Recipe : पावसाळा स्पेशल चटपटीत कच्चा चिवडा, पाहताच तोंडाला सुटेल पाणी, एकदा रेसिपी पाहाच