TRENDING:

मिश्र पिठांपासून बनवा पौष्टिक मल्टीग्रेन भाकरी, सर्वच आवडीने खातील

Last Updated:
कोल्हापुरातील एका महिलेने मल्टीग्रेन भाकरी हा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा याबाबत सांगितले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाकरी आवडू शकते.
advertisement
1/7
मिश्र पिठांपासून बनवा पौष्टिक मल्टीग्रेन भाकरी, सर्वच आवडीने खातील
लहान मुलांसाठी पौष्टिक काहीतरी खायला बनवण्याचे प्रयत्न आई करत असते. मात्र बऱ्याचदा कितीही पौष्टिक पदार्थ बनवला तरी तो चविष्ट नसल्यामुळे तो खाल्ला जात नाही. त्यामुळेच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> एका महिलेने मल्टीग्रेन भाकरी हा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा याबाबत सांगितले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाकरी आवडू शकते.
advertisement
2/7
मल्टीग्रेन भाकरी या नावावरुनच या पदार्थाचे वैशिष्ट्य लक्षात येऊ शकते. वेगवेगळे मिश्र धान्यांच्या पिठापासून बनवलेली ही भाकरी साधारण भाकरी सारखी दिसते. मात्र विविध घटकांनी युक्त असल्यामुळे ही भाकरी खायला अगदी चविष्ट लागते. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही भाकरी बनवायला जास्त वेळही लागत नाही, असे या मल्टीग्रेन भाकरी बद्दल कोल्हापूरच्या नीलम बनछोडे या गृहिणीने सांगितले आहे.
advertisement
3/7
नीलम यांनी आजवर अनेक पाककला स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सजावट स्पर्धांमध्ये सहभाग नोदवत शेकडो बक्षिसे आणि प्रमाणपत्रे मिळवली आहेत. अशाच एका चुलीवरील स्वयंपाक स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचीही मल्टीग्रेन भाकरीची स्वयंपाक सादर केली होती. त्यातच त्यांना या पाककृती बद्दल बक्षीस मिळाले होते.
advertisement
4/7
सहसा काही मिश्र पिठांपासून थालीपीठ बनवले जाते. मात्र याच मिश्र पिठांचा वापर करून थालीपीठ न करता भाकरी बनवता येते. ही मल्टीग्रेन भाकरी बनवण्यासाठी 1 किलो ज्वारी घेतल्यास 1 किलो बाजरी, अर्धा किलो नाचणी, अर्धा किलो तांदूळ, पाव किलो मका, पाव किलो उडीद डाळ, अर्धी वाटी मेथी आणि अर्धी वाटी सोयाबीन हे सर्व घटक एकत्रित करून दळून आणावे. या तयार पिठाची भाकरी बनवता येते.
advertisement
5/7
सुरुवातीला एका परातीत या दळून आणलेल्या तयार पीठ घ्यावे. पीठ मळण्यासाठी पाणी गरम करुन घ्यावे. पिठामध्ये चवीपुरते मीठ, ठेचलेली लसणाची पेस्ट, थोडा ओवा आणि धने-जिरे पूड टाकावी.
advertisement
6/7
ज्याप्रमाणे भाकरीचे पीठ मळून घेतले जाते, तसेच या भाकरीचे पीठ मळावे. पीठ काही मिनिटांसाठी सेट होऊ द्यावे. सामान्य ज्वारी किंवा बाजरीच्या भाकऱ्यांप्रमाणेच हे पीठ तयार होते. त्यानंतर आपल्याला हव्या तशा पातळ किंवा जाड भाकऱ्या कराव्यात. या भाकरीबरोबर पिठलं, मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाणा चटणी देखील खायला उत्तम लागते.
advertisement
7/7
दरम्यान ही मिश्र पिठांची भाकरी वर्षभर खाल्ली तरी चालते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लहान मुले खाण्यासाठी खूप दमवतात. अशावेळी ही चविष्ट आणि पौष्टिक भाकरी लहान मुले देखील आवडीने खातात, असेही नीलम यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
मिश्र पिठांपासून बनवा पौष्टिक मल्टीग्रेन भाकरी, सर्वच आवडीने खातील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल