TRENDING:

जेवणाच्या ताटात चटणी हवीच, ओल्या हरभऱ्यापासून बनवा झणझणीत, रेसिपी एकदा पाहाच

Last Updated:
ओला हरभरा मार्केटमध्ये आला की त्यापासून नवनवीन पदार्थ गृहिणी बनवत असतात. आमटी, हुरडा, सोले वांगे आणि विशेष म्हणजे ओल्या हरभऱ्याची चटणी. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही चटणी अतिशय टेस्टी लागते.
advertisement
1/7

2/7
दररोजच्या जेवणात तुम्ही ही चटणी खाऊ शकता. झणझणीत अशी ओल्या हरभऱ्याची चटणी कशी बनवायची? ही रेसिपी अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.
advertisement
3/7
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : भाजून घेतलेले हरभरे , हिरवी मिरची, कडीपत्ता, जिरे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि मीठ हे साहित्य लागणार आहे.
advertisement
4/7
चटणी बनवण्याची कृती : सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात भरभरे, हिरवी मिरची, कडीपत्ता, लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे.
advertisement
5/7
चटणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर ते साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे. चटणी ही थोडी जाडसर ठेवायची आहे. एकदम बारीक करायची नाही.
advertisement
6/7
ही चटणी तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. पाट्यावर वाटून घेतल्यास चटणी आणखी टेस्टी लागते. या चटणीमध्ये तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडी चवीपुरती साखर सुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर लिंबाचा रस सुद्धा तुम्ही टाकू शकता.
advertisement
7/7
मिक्सरमधून बारीक केल्यानंतर चटणी तयार होते. ही चटणी जेवणासोबत अतिशय टेस्टी लागते. दररोजच्या जेवणात त्यावर थोडे तेल घेऊन तुम्ही ही चटणी खाऊ शकता. त्याचबरोबर एखाद्या वेळी भाजी नसल्यास ही चटणी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता. तुम्हाला भाजीची आठवणच येणार नाही अशी ही चविष्ट चटणी तयार होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
जेवणाच्या ताटात चटणी हवीच, ओल्या हरभऱ्यापासून बनवा झणझणीत, रेसिपी एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल