TRENDING:

घरीच बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स, या पद्धतीनं होतील अतिशय चविष्ट

Last Updated:
बऱ्याचदा मार्केटमधील नूडल्स खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. त्यासाठी ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक नुडल्स उत्तम पर्याय आहे.
advertisement
1/6
घरीच बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स, या पद्धतीनं होतील अतिशय चविष्ट
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना नूडल्स खायला आवडतं. पण बऱ्याचदा मार्केटमधील नूडल्स खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. त्यासाठी ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक नुडल्स उत्तम पर्याय आहे. हे नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी माहिती दिलीय.
advertisement
2/6
नूडल्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य : एक वाटी ज्वारीचे पीठ, एक वाटी पाणी, तेल, गाजर, शिमला मिरची, पत्ता गोबी, फ्रेंच बींन, कांदा, बारीक चिरलेला लसूण, अद्रक, बारीक चिरलेली मिरची, ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोऱ्या हे साहित्य लागतं.
advertisement
3/6
ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवायची कृती : सर्वप्रथम नूडल्स करण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घालून त्यामध्ये थोडसं तेल घालायचं. त्याला उकळी आली की त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे. हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं.
advertisement
4/6
त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्यायचं. त्यानंतर हाताला तेल लावून हे मिश्रण थोडंसं मळून घ्यायचं. तुम्ही सोऱ्यामध्ये घालून त्याचे नूडल्स तयार करायचे. पाच मिनिटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर त्याला थोडं तेल लावून द्यायचं.
advertisement
5/6
कढईमध्ये थोडसं तेल घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, अद्रक, हिरवी मिरची हे टाकून ते छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या आहेत त्या सर्व टाकायच्या. भाजी जास्त शिजवायची नाही. यानंतर रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप टाकायचं आणि सोया सॉस टाकायचं. आपल्या आवडीनुसार ब्लॅक पेपर पावडर टाकायची. हे मिश्रण दोन मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये नूडल्स तयार झालेले आहेत ते टाकून घ्यायचे. ते एक दोन मिनिटात शालो झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा.
advertisement
6/6
नूडल्स एका प्लेटमध्ये टाकून त्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी कांद्याची पात बारीक चिरून टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या पिठापासून घरच्या घरी नूडल्स तयार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
घरीच बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स, या पद्धतीनं होतील अतिशय चविष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल