उन्हाळ्यात तुरीच्या डाळीपासून बनवा कळणा, विदर्भ स्टाईल रेसिपीची अस्सल ग्रामीण चव
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील पारंपरिक पदार्थ म्हणजे कळणा. तुरीच्या डाळीपासून तयार होणारा हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो. ग्रामीण भागातील अस्सल चव या भाजीत दिसून येते.
advertisement
1/7

उन्हाळ्यामध्ये वर्षभर साठवून ठेवण्यासाठी अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे तुरीची डाळ. वर्षभर साठवण्यासाठी उन्हाळ्यात तुरीची डाळ ग्रामीण भागात आजही घरीच बनवली जाते. ती डाळ बारीक करताना त्यात बारीक कण राहतात. त्याला विदर्भात कळणा म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात अनेक काम करून महिलांना थकवा येतो. त्यामुळे कमीत कमी वेळात काय बनवायचं? तर तेव्हा चविष्ट आणि झटपट होणारा कळणा बनवला जातो. कळणा कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील वृषाली भुजाडे यांनी दिली आहे.
advertisement
2/7
कळणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : कळणा त्यांनतर कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, लसूण, बारीक चिरलेली कैरी, लाल मिरची, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे आणि मोहरी हे साहित्य लागेल.
advertisement
3/7
कळणा बनवण्याची कृती : सर्वात आधी भांड्यात तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. तो थोडा परतवून घेतला की लगेच लाल मिरची टाकून घ्यायची आहे. कांदा थोडा लालसर झाला की त्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा.
advertisement
4/7
त्यानंतर कैरी टाकायची. हे सर्व मिश्रण लालसर झालं की त्यात लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. ते थोड परतवून घ्यायचं आणि 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे.
advertisement
5/7
आता 2 मिनिटानंतर त्यात टोमॅटो टाकून टाकायचे. टोमॅटो शिजतपर्यंत पाणी गरम करून घ्यायचे आहे. कळणा बनवताना गरम पाणी वापरल्यास त्याची चव आणखी छान लागते. तोपर्यंत टोमॅटो शिजत आलेले असेल. त्यानंतर त्यात कळणा टाकून घ्यायचा आहे. कळणा त्या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकले की, कळणा त्यात मिक्स करून घ्यायचा. त्यात गडे राहायला नको. तुम्ही त्यासाठी रवीचा वापर करू शकता.
advertisement
6/7
कळणा पातळ हवं असल्यास पाणी कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर आणखी 10 ते 15 मिनिट कळणा शिजवून घ्यायचा आहे. चविष्ट आणि झणझणीत असा कळणा तयार झालेला असेल. हा कळणा भाकरी सोबत खूप टेस्टी लागतो. त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता.
advertisement
7/7
तुमच्या घरी जर डाळ घरी बनवत नसेल आणि जाते सुद्धा नसेल तर तुम्ही तुरीची डाळ मिक्सरमधून बारीक करून सुद्धा कळणा तयार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात तुरीच्या डाळीपासून बनवा कळणा, विदर्भ स्टाईल रेसिपीची अस्सल ग्रामीण चव