Fried Item : तळलेले पदार्थ मऊ का पडतात? कुरकुरीत राहण्यासाठी काय उपाय? गृहिणींनो 'या' सोप्या ट्रिक्स वापरून पाहाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Why fried food becomes soggy : पापड, चिवडा, चकली, कांदाभजी कापडते नरम? कुरकुरीत राहण्यासाठी या घरगुती टिप्स करतील मदत
advertisement
1/10

संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला वेध लागतात ते म्हणजे चहासोबत काहीतरी कुरकुरीत खाण्याचे. मग आपण हौसेने कांदा भजी, बटाटा वडा, चिवडा किंवा मुलांसाठी कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स तळायला घेतो. एवढच नाही तर जेवणात लागणारे पापड, कुरडई, नळ्या सारखे पदार्थ ही स्वयंपाक घरात बनतो. कढईतून गरम गरम काढताना तर ते अगदी कडक आणि छान असतात, पण पानात वाढेपर्यंत किंवा डब्यात भरेपर्यंत ते अचानक मऊ (Soggy) पडतात. त्याचा तो कुरकुरीतपणा जातो आणि सगळी मजाच हिरमुसली होते.
advertisement
2/10
आपल्यासारख्या गृहिणींना हे नेहमीच जाणवतं की, एवढ्या मेहनतीने तळलेला पदार्थ जर थोड्याच वेळात 'चामट' झाला की घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही कमी होतो. कधी पिठाचा अंदाज चुकतो, तर कधी तळण्याची पद्धत. पण घाबरू नका, तळलेले पदार्थ हॉटेलसारखे जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आपण पाहूया.
advertisement
3/10
1. घाईघाईत डबा बंद करण्याची चूकआपण काय करतो? चिवडा, पापड, भजी किंवा वडे तळले की ते गरम असतानाच लगेच डब्यात भरतो किंवा वरून झाकण ठेवतो. गरम पदार्थामुळे जी वाफ तयार होते, तिचे रूपांतर पाण्यात होते आणि तो ओलावा पदार्थाला मऊ पाडतो.तळलेला पदार्थ पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच डब्यात भरा. किंवा सुरुवातीला डब्याचे झाकण अर्धे उघडे ठेवा.
advertisement
4/10
2. तेल 'कडकडीत' गरम आहे का?जर तेल पुरेसं गरम नसेल आणि तुम्ही त्यात पदार्थ टाकला, तर तो पदार्थ तेल जास्त शोषतो आणि आतून तेलकट झाल्यामुळे मऊ पडतो. याउलट खूप जास्त कडक तेल असेल तर पदार्थ बाहेरून जळतो आणि आतून कच्चा राहतो.तेल मध्यम गरम असावे. पिठाचा एक छोटा गोळा टाकल्यावर तो लगेच वर आला की समजावं तेल परफेक्ट आहे.
advertisement
5/10
3. पिठात 'मोहन' टाकायला विसरू नका चकली, शंकरपाळी किंवा भजी करताना पिठात थोडे 'मोहन' (गरम तेलाचे मोहन) घालणे खूप महत्त्वाचे असते. जर हे मोहन नसेल किंवा त्याचे प्रमाण चुकले तरी पदार्थ मऊ पडू शकतात. पीठ मळताना त्यात एक-दोन चमचे कडकडीत गरम तेल घाला. यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो.
advertisement
6/10
4. कुरकुरीतपणासाठी 'तांदळाचं पीठ' किंवा 'कॉर्नफ्लोअर'फक्त बेसन वापरून भजी केली की ती लवकर मऊ होतात. हॉटेलमध्ये किंवा गाडीवर भजी कुरकुरीत राहण्याचं एक गुपित म्हणजे त्यांचं पीठ.बेसनामध्ये नेहमी थोडं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर मिसळा. यामुळे तळलेला पदार्थ बराच वेळ कडक राहतो.
advertisement
7/10
5. कागदावर (Tissue Paper) काढण्याची पद्धतआपण कढईतून पदार्थ काढला की लगेच प्लेटमध्ये ठेवतो. खालच्या बाजूचे तेल तिथेच साचून राहते आणि खालचा भाग मऊ होतो.तळलेले पदार्थ नेहमी 'जाळीदार' भांड्यात किंवा टिश्यू पेपरवर काढा. जास्तीचे तेल शोषले गेले की पदार्थ कुरकुरीत राहण्यास मदत होते.
advertisement
8/10
गृहिणींसाठी एक खास 'बोनस' टीपजर तुमचे पदार्थ मऊ पडलेच, तर ते पुन्हा तेलात टाकू नका. त्याऐवजी तव्यावर थोडे गरम करा किंवा 'एअर फ्रायर' असल्यास त्यात 1-2 मिनिटे ठेवा. ते पुन्हा कुरकुरीत होतील.
advertisement
9/10
स्वयंपाकात थोड्या चुका तर होणारच, कधी पीठ सैल होईल तर कधी तेल थंड राहील. पण या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या हातची भजी आणि चकली घरातले सगळे अगदी चवीने आणि कुरकुर आवाज करत खातील.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Fried Item : तळलेले पदार्थ मऊ का पडतात? कुरकुरीत राहण्यासाठी काय उपाय? गृहिणींनो 'या' सोप्या ट्रिक्स वापरून पाहाच