TRENDING:

Rice Vs Chapati : भात की चपाती, तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं चांगलं?

Last Updated:
Rice Or Chapati : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर भात सोडून द्या, तुम्हाला सडपातळ व्हायचं असेल तर चपाती कमी खा. असे सल्ले दिले जातात. पण भात आणि चपाती यापैकी आरोग्यासाठी काय चांगलं आहे, याबाबत आहारतज्ज्ञांना माहिती दिली आहे.
advertisement
1/7
Rice Vs Chapati : भात की चपाती, तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं चांगलं?
खरं तर भात आणि चपाती हे दोन्ही आपल्या देशातील मुख्य खाद्यपदार्थ. दैनंदिन जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दक्षिण भारतात तांदूळ जास्त वापरला जातो, तर उत्तर भारतात गव्हाच्या रोट्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पण अनेकदा असा प्रश्न पडतो की कोणतं धान्य खाणं चांगलं आहे, भात की चपाती?
advertisement
2/7
मुंबईतील प्रसिद्ध पोषणतज्ञ मेहर पंजवानी म्हणाल्या की, भात की चपाती तुमच्यासाठी काय चांगलं आहे, हे तुमच्या आतड्यांना काय पचण्याची सवय आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला वर्षानुवर्षे खाल्लेले धान्य पचवण्याची सवय होते. तुम्ही कोणतंही अन्न व्यवस्थित पचवू शकता की नाही हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं आणि तुम्ही जे काही पचवू शकता ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
advertisement
3/7
चपाती खाणाऱ्यांचं आतडं ग्लूटेन सहज पचवू शकतात. ज्यांना ग्लूटेन पचत नाही त्यांनी भात खावा. पण भातामध्येही पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही जास्त फायबर असलेले तपकिरी किंवा लाल तांदूळ खावेत. निरोगी निवडीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काळा भातदेखील खाऊ शकता.
advertisement
4/7
डॉ. पंजवानी म्हणतात, भात किंवा रोटीच्या वादात पडण्यापेक्षा, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे समजून घेणं चांगलं. भात असो किंवा चपाती जेव्हा तुम्ही कोणतंही धान्य रिफाइंड करून खाता तेव्हा ते पचवणं अधिक कठीण होतं.
advertisement
5/7
पूर्वीच्या काळात जेव्हा आपण चपाती खायचो तेव्हा त्यात कोंडा असायचा. या कोंड्यात भरपूर फायबर होते. भाताच्या बाबतीतही तेच आहे. जेव्हा तांदूळ वाढतो तेव्हा तो तपकिरी रंगाचा असतो. जेव्हा तो रिफाइंड केला जातो तेव्हा तो पांढरा होतो.
advertisement
6/7
जर तुम्हाला निरोगी खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही भरड धान्य खावं. उदाहरणार्थ, गव्हाऐवजी तुम्ही ज्वारी, बार्ली, बाजरी ब्रेड खाऊ शकता. पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही तपकिरी तांदूळ, लाल तांदूळ किंवा काळा तांदूळ खाऊ शकता.
advertisement
7/7
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमचा आहार त्यात सर्वात मोठा वाटा आहे. म्हणून तुमचा आहार योग्य ठेवणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rice Vs Chapati : भात की चपाती, तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं चांगलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल