Beer ने काही होत नाही असं म्हणत जास्त प्याल तर जिवानिशी जाल, बिअरचे साइड इफेक्ट्स आधी माहित करुन घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हीही वारंवार किंवा जास्त प्रमाणात बिअर पीत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकते. पाहूया बिअर पिण्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम.
advertisement
1/10

सध्याच्या 'पार्टी कल्चर'मध्ये बिअर पिणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. अनेकदा मित्रांसोबत बसल्यावर किंवा थकावट दूर करण्यासाठी लोक दारु पितात, त्यात "बिअरमध्ये अल्कोहोल कमी असतं, याने काय होतंय?" असं म्हणून अनेक जण बॉटलवर बॉटल संपवतात. पण तुमची हिच चुक तुमच्या जिवावर बेतू शकते.
advertisement
2/10
जर तुम्हीही वारंवार किंवा जास्त प्रमाणात बिअर पीत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकते. पाहूया बिअर पिण्याचे शरीरावर होणारे विघातक परिणाम:
advertisement
3/10
1. यकृतावर (Liver) होतो थेट हल्लाबिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी, जेव्हा तुम्ही ती जास्त प्रमाणात पिता, तेव्हा तुमच्या यकृताला ते फिल्टर करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. यामुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या उद्भवते. जर ही सवय बदलली नाही, तर त्याचे रूपांतर लिव्हर सिरोसिस (Liver Cirrhosis) मध्ये होते, जो एक जीवघेणा आजार आहे.
advertisement
4/10
2. बिअर बेली (Beer Belly) आणि लठ्ठपणाबिअरमध्ये 'एम्प्टी कॅलरीज' भरपूर असतात. यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते, विशेषतः पोटाचा घेरा वाढतो. यालाच 'बिअर बेली' म्हणतात. वाढलेला लठ्ठपणा हा हृदयविकार, मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरला आमंत्रण देतो.
advertisement
5/10
3. किडनीवर पडतो ताणबिअर ही 'डिहायड्रेटिंग' असते. ती प्यायल्यानंतर वारंवार लघवीला होते, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि भविष्यात किडनी स्टोन किंवा किडनी फेल्युअरचा धोका वाढतो.
advertisement
6/10
4. हृदयाचे आरोग्य धोक्यातअति प्रमाणात बिअर पिण्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होतो. यामुळे 'कार्डिओमायोपॅथी' नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हृदय रक्त पंप करण्यास असमर्थ ठरते. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
advertisement
7/10
5. मानसिक आरोग्य आणि झोपअनेकांना वाटते की बिअर प्यायल्याने चांगली झोप लागते, पण हे साफ चुकीचे आहे. बिअरमुळे तुमच्या झोपेचे चक्र (Sleep Cycle) बिघडते. यामुळे चिडचिडेपणा, नैराश्य (Depression) आणि स्मरणशक्ती कमी होणे असे मानसिक विकार जडू शकतात.
advertisement
8/10
6. रक्तातील साखरेची पातळी (Diabetes)बिअरमुळे रक्तातील इन्सुलिनच्या पातळीत अचानक चढ-उतार होतात. जे लोक आधीच मधुमेही आहेत, त्यांच्यासाठी बिअर पिणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.
advertisement
9/10
कोणत्याही प्रकारचे मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. "मर्यादित प्रमाणात बिअर चांगली असते" हा केवळ एक गैरसमज आहे. तुमचे शरीर आणि तुमचे कुटुंब तुमच्यासाठी मौल्यवान आहे, त्यामुळे अशा सवयींपासून लांब राहणेच हिताचे आहे.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beer ने काही होत नाही असं म्हणत जास्त प्याल तर जिवानिशी जाल, बिअरचे साइड इफेक्ट्स आधी माहित करुन घ्या