IND vs NZ : विजयाने सुरूवात, पण 5 गोष्टींनी वाढलं टेन्शन, वर्ल्ड कपच्या 17 दिवस आधी सूर्या-गंभीरसमोर मोठं चॅलेंज!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांना पराभव केला आहे.
advertisement
1/8

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांना पराभव केला आहे.
advertisement
2/8
भारताने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड फक्त 190 धावा करू शकली.त्यामुळे भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
3/8
भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी पाच गोष्टींनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. या पाच गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
4/8
पहिली गोष्ट म्हणजे शुभमन गिलला काढून संजू सॅमसनला संघात घेतलं, पण पहिल्यात सामन्यात तो फ्लॉप ठरला. संजू अवघ्या पहिल्या सामन्यात 10 धाावा करून बाद झाला.
advertisement
5/8
टीम इंडियाचा तिलक वर्मा सध्या दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली. मात्र तो देखील फ्लॉप ठरला. ईशाने 785 दिवसांनतर भारतासाठी खेळला पण तो अवघ्या 8 धावात बाद झाला. त्यामुले तिलकच्या जागी संधी देऊनही ईशान फ्लॉप ठरला.
advertisement
6/8
शिवम दुबे देखील मोठ्या धावा करू शकल्या नाही, तो फक्त 9 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे त्याची बॅटींग तर चाललीच नाही आणि बॉलिंगमध्येही त्याने सूरूवातीटच्या दोन ओव्हरमध्ये खूप धावा दिल्या.त्यानंतर शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट काढले होते.
advertisement
7/8
सू्र्यकुमार यादव मागच्या अनेक सामन्यापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. पण आजच्या सामन्यात त्याने 32 धावांची खेळी केली, पण त्याला धावा आणखी जास्त करता आल्या नाही आहेत.
advertisement
8/8
बुमराहच्या 10 व्या ओव्हर दरम्यान रिंकु सिहंने चॅपमॅनची एक सोप्पी कॅच ड्रॉप केली होती. विशेष म्हणजे एक कॅच सोडल्यानंतर त्याने दुसरी कॅच घेतली होती. त्याच्यानंतर ईशान किशनने डेरी मिचेलची कॅच ड्रॉप केली होती.त्यामुळे भारताची एक चूक त्यांच्या हातून वर्ल्डकप हिसकावू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विजयाने सुरूवात, पण 5 गोष्टींनी वाढलं टेन्शन, वर्ल्ड कपच्या 17 दिवस आधी सूर्या-गंभीरसमोर मोठं चॅलेंज!