Tea : जेवल्यानंतर चहा पिता? मग त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम एकदा वाचाच, सवय सोडून द्याल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारतातील बहुसंख्य लोकं ही चहा प्रेमी आहेत. बरेच लोक दिवसातून साधारणपणे दोन ते तीन वेळा चहा पितात. काही लोकं तर दुपार किंवा रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा चहाचा आस्वाद घेतात. मात्र असं करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तेव्हा जेवल्यानंतर चहा प्यायल्याने आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/4

गॅसची समस्या : जेवल्यानंतर चहा प्यायल्यावर पचनशक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो. चहा प्यायल्याने जेवण पचण्यास अडचण येऊ शकते, तसेच गॅस होऊ शकतो. खरंतर जेवल्यानंतर दूध वाली चहा प्यायल्यावर शरीरातील पाचक ऍसिड तयार होतं. ज्यामुळे जेवण पचण्यास जास्त वेळ लागतो.
advertisement
2/4
ब्लड प्रेशर : ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे असतो अशा लोकांनी चहा पिणं टाळायला हवं. चहामध्ये कॅफिनची मात्रा जास्त असते ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढत आणि आरोग्याशी निगडित समस्या निर्माण होते. चहा पिण्याची इच्छा होत असेल तर लेमन टीचे सेवन करावे.
advertisement
3/4
आयरनची कमतरता : जेवल्यानंतर चहा प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळू शकत नाहीत. ज्यामुळे शरीरात आयरनची कमतरता जाणवते. ज्यामुळे एनीमियाचा धोका वाढतो.
advertisement
4/4
ICMRच्या सांगण्यानुसार, दररोज फक्त 300 मिलीग्राम कॅफिनचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या सल्लयानुसार जेवल्यानंतर जवळपास एक ते दोन तास चहा, कॉफीचे सेवन करू नये. चहामध्ये टॅनिन असते ज्यामुळे शरीरात आयरन कमी प्रमाणात शोषले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea : जेवल्यानंतर चहा पिता? मग त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम एकदा वाचाच, सवय सोडून द्याल