TRENDING:

च्यूइंगम किती वेळ तोंडात चघळावं? जास्त वेळ चघळल्यास पडाल आजारी

Last Updated:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच च्यूइंगम खाणं पसंत करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार च्यूइंगम खाणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, च्यूइंगम तोंडांत चघळल्याने कॅव्हिटी होण्याचा धोका कमी होतो आणि यामुळे जबडा देखील मजबूत होतो. तसेच यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण ७५ टक्क्यांहून कमी होत. च्यूइंगम चघळण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील शरीरावर होऊ शकतात.
advertisement
1/5
च्यूइंगम किती वेळ तोंडात चघळावं? जास्त वेळ चघळल्यास पडाल आजारी
अनेकजण तोंडांत टाकलेला च्यूइंगम बराच काळ चघळत राहतात. यामुळे आजारांना आमंत्रण मिळू शकते. तेव्हा च्यूइंगम कितीवेळ तोंडात चघळावी याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
2/5
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार जर च्यूइंगम चघळून कॅव्हिटी होण्याचा त्रास दूर करायचा असेल तर शुगर फ्री च्यूइंगमचा वापर करावा. च्यूइंगम जास्तीत जास्त 15 मिनिट चघळावे. जास्त वेळ च्यूइंगम चघळल्याने दातांचे नुकसान होते.
advertisement
3/5
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जर कोणती व्यक्ती जास्त वेळ च्यूइंगम चघळत असेल तर तिच्या दातांवरील कोटिंग ज्याला एनेमल असे म्हणतात त्याला धोका निर्माण होतो. यामुळे दातांचे डीमिनरलाइजेशन होते. तेव्हा जर तुम्हाला दातांशी निगडित कोणती समस्या असेल तर च्यूइंगम खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
4/5
काहीजण च्यूइंगम एक तास किंवा त्याहून जास्त वेळ तोंडात चघळतात परंतु यामुळे हिरड्यांना डिसऑर्डर होऊ शकतो. तसेच जास्त वेळ च्यूइंगम चघळल्याने टेम्पोरोमैंडिबुलर जॉइंट्सचा त्रास असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात.
advertisement
5/5
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
च्यूइंगम किती वेळ तोंडात चघळावं? जास्त वेळ चघळल्यास पडाल आजारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल