TRENDING:

Using Mobile At Night : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणं पडेल महाग, जाऊ शकतात डोळे! वाचा दुष्परिणाम

Last Updated:
बऱ्याच लोकांना दिवसा काम केल्यानंतर असे अवतरते आता रात्री मोबाइल पाहावा. म्हणून ते बेडवर पडून आरामात मोबाईल पाहात राहतात. परंतु, हे खूप गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणूनच बेडवर झोपण्यापूर्वी फोन दूर ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चला पाहूया रात्रीच्या अंधारात मोबाईल पाहण्याचे काय दुष्परिणाम आहेत.
advertisement
1/7
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणं पडेल महाग, जाऊ शकतात डोळे! वाचा दुष्परिणाम
फोनचा वापर इतका वाढला आहे की, लोक आता त्याशिवाय राहू शकत नाहीत. लोक सकाळी सगळ्यात आधी त्यांचा फोन पाहतात आणि झोपायच्या आधी फोन बघत राहतात. फोनवर वेगवेगळे अप्स स्क्रोल करण्यात तासंतास घालवतात. पण खूप कमी लोक असतील, ज्यांना त्याचा धोका माहित असेल.
advertisement
2/7
झोपण्यापूर्वी अंथरुणावर फोन न पाहण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक धोके होऊ शकतात. जेव्हा आपण झोपून फोन वापरतो तेव्हा आपले हात बराच वेळ त्याच स्थितीत राहतात. समस्या अशी आहे की, आपले शरीर त्या अस्ताव्यस्त पोझिशन्स फार काळ टिकवून ठेवण्यासाठी तयार केलेले नाही.
advertisement
3/7
म्हणूनच अशा पोझमध्ये तासंतास घालवल्याने तुमच्या शरीरावर, विशेषतः मानेवर ताण येऊ शकतो. याव्यतिरिक्त, तुमच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहण्यासाठी तुमची मान जास्त काळ पुढे केल्याने तुमच्या मानेच्या मणक्यावर ताण येऊ शकतो. या स्थितीला सामान्यतः 'टेक्स्ट नेक' म्हणून ओळखले जाते.
advertisement
4/7
झोपेत समस्या : रात्री उशिरापर्यंत फोन वापरण्याचा सर्वात धोकादायक दुष्परिणाम म्हणजे झोप न येण्याची समस्या. सतत फोन वापरल्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलॅटोनिन हॉर्मोनची कमतरता निर्माण होते. परिणामी, निद्रानाश सुरू होतो. एक वेळ अशी येते की इच्छा असूनही व्यक्तीला झोप येत नाही.
advertisement
5/7
डोळ्यांवर ताण : जेव्हा तुम्ही दीर्घकाळ फोन वापरता तेव्हा तुमच्या डोळ्यांना उजळ स्क्रीन आणि आजूबाजूच्या वातावरणातील कॉन्ट्रास्टशी जुळवून घेण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. यामुळे डोळ्यांना थकवाही येऊ शकतो. तुम्ही अंधारात बराच वेळ फोन वापरत असाल तर कोरडेपणा, खाज सुटणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे अशा समस्याही उद्भवतात.
advertisement
6/7
मेंदूवर नकारात्मक परिणाम : रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरणं मेंदूसाठीही हानिकारक आहे. त्याचा मनावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे चिडचिड वाढते आणि विसरण्याची समस्या सुरू होते. इतकंच नाही तर फोनच्या अतिवापरामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या समस्याही उद्भवतात.
advertisement
7/7
डोकेदुखी : तुम्ही रात्री बराच वेळ फोन वापरत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. फोनमधून निघणाऱ्या विविध प्रकारच्या प्रकाशाचा डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम होऊ शकतो. हे इतकं धोकादायक आहे की, त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते आणि डोकेदुखीही वाढते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Using Mobile At Night : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणं पडेल महाग, जाऊ शकतात डोळे! वाचा दुष्परिणाम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल