Kitchen Tips : 'या' सोप्या युक्त्या वापरून साठवा कॉफी; कितीही दिवस ठेवा, अजिबात होणार नाही कडक!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Simple tricks to store coffee for long time : चहा पिणाऱ्यांप्रमाणे हल्ली कॉफी पिणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. लोकांना कॉफी कोणत्याही स्वरूपात प्यायला आवडते. बरेच लोक बाहेरची कॉफी पिणे पसंत करतात तर काही लोकांना घरीच कॉफी बनवून प्यायला आवडते. मात्र यासाठी घरात कॉफी साठवावी लागते आणि काहीवेळा घरातील कॉफी कडक होते. आज आम्ही तुम्हाला यावरच काही सोपे उपाय सांगणार आहोत.
advertisement
1/7

कॉफीचे अनेक अनेक प्रकार असतात. बहुतांश लोक बाहेर कॉफी पोहतात तर काही आरोग्य आणि वजनाच्या दृष्टीने घरीच बनवलेली हेल्दी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. मात्र ही कॉफी साठवणे तसे सोपे नसते. योग्य काळजी न घेतल्यास कॉफी लवकरच कडक होते आणि कालांतराने तिची चवही बिघडते. चला पाहूया कॉफी व्यवस्थित ठेवण्यासाठी काही उपाय.
advertisement
2/7
योग्य कंटेनरचा वापर : कॉफी साठवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे योग्य कंटेनरच्या वापर. कॉफीसाठी हवाबंद कंटेनर वापरा. त्याचे झाकण पक्के असल्याची खात्री करा. प्लास्टिकपेक्षा काचेचे भांडे वापराने चांगले.
advertisement
3/7
कॉफीचा डबा व्यवस्थित हाताळा : काहीवेळा कॉफी बनवतात घाईघाईत आपण डबा उघडतो आणि ओला चमचा किंवा हात त्या कॉफी पावडरमध्ये घातला जातो. मात्र असे अजिबात करू नका. यामुळे कॉफीमध्ये मॉइश्चर तयार होते आणि कॉफी कडक होऊ लागते. तसेच डब्याचे झाकण लगेच बंद करा.
advertisement
4/7
कॉफी योग्य ठिकाणी ठेवा : बऱ्याच लोकांना सवय असते कोणताही पदार्थ जास्त काळ टिकवायचा असेल तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. मात्र कॉफीसोबत असे करून चालत नाही. कारण कॉफी सारखी फ्रिजच्या आता बाहेर केल्याने त्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि परिणामी कॉफी कडक होऊ लागते. म्हणून कॉफी नेहमी रूम टेम्परेचरवर साठवा.
advertisement
5/7
एक युक्ती वापरून पाहा : तुमच्याकडे कितीही योग्यप्रकारे साठवूनही कॉफी कडक होत असेल तर ही युक्ती करा. कच्चे तांदळाचे दाणे टिश्यू पेपर किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून कॉफी जारमध्ये तळाशी ठेवा. तांदूळ नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेतो आणि तुमची कॉफी कोरडी राहते.
advertisement
6/7
आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे नवा कॉफीचा जार आणल्यानंतर त्यामध्ये जे सिल्व्हर फॉइल असते. ते काढून फेकू नका. हे सील अर्धवट उघडा आणि कॉफी काढल्यानंतर परत लावून ठेवा. हे सील अतिरिक्त ढाल म्हणून काम करते आणि कॉफीमध्ये ओलावा येऊ देत नाही.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : 'या' सोप्या युक्त्या वापरून साठवा कॉफी; कितीही दिवस ठेवा, अजिबात होणार नाही कडक!