TRENDING:

फिटनेस असावी तर अशी.... IPS कृष्ण प्रकाश यांच्यासमोर तरुण पोलीस पडले फिके, कर्मचाऱ्यांनी डोक्याला हात लावला

Last Updated:
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यात त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासोबतच त्यांच्या फिटनेसची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
advertisement
1/7
फिटनेस असावी तर अशी.... IPS कृष्ण प्रकाश यांच्यासमोर तरुण पोलीस पडले फिके
शिस्त, धडाकेबाज कारवाया आणि फिटनेससाठी ओळखले जाणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) कृष्ण प्रकाश सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर आहेत.
advertisement
2/7
या दौऱ्यात त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासोबतच त्यांच्या फिटनेसची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
advertisement
3/7
श्रीरामपूर येथे तपासणीनंतर झालेल्या एका फिटनेस चॅलेंजमध्ये ५४ वर्षीय कृष्ण प्रकाश यांनी अवघ्या १ मिनिट १० सेकंदात ५० जोर (Dips) मारून उपस्थित तरुण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थक्क केले.
advertisement
4/7
शारीरिक सुदृढतेसाठी आणि कवितेची आवड असणारे अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
advertisement
5/7
'आयर्न मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश हे राजकारण्यांच्या दबावाखाली न येता गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईसाठी ओळखले जातात.
advertisement
6/7
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आयर्न मॅन खिताब पटकावल्याप्रकरणी ही नोंद करण्यात आली आहे.
advertisement
7/7
झारखंडमधील हजारीबागचे रहिवासी असलेले कृष्ण प्रकाश हे १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी गडचिरोली, नांदेड ग्रामीण, मालेगाव, बुलडाणा, अमरावती ग्रामीण, अहमदनगर, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी काम केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
फिटनेस असावी तर अशी.... IPS कृष्ण प्रकाश यांच्यासमोर तरुण पोलीस पडले फिके, कर्मचाऱ्यांनी डोक्याला हात लावला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल