TRENDING:

Relationship Tips : रिलेशनशिप कोचने दिल्या खास टिप्स! बायको-गर्लफ्रेंडला खुश ठेवण्याचा 'हा' आहे सिम्पल फॉर्म्युला

Last Updated:
Relationship tips by experts in marathi : नात्यात एकमेकांचा आदर करणं आणि एकमेकांना खुश ठेवणं खूप गरजेचं असतं, हे तर सर्वांना ठाऊकच आहे. बऱ्याचदा आपलं प्रेम आहे, हे वेळोवेळी आपल्याला व्यक्त करावं लागतं, किंबहुना ते तसं करायला हवं. आज आम्ही तुम्हाला रिलेशनशिप कोच सीमा आनंद यांनी दिलेल्या काही खास टिप्स सांगत आहोत, ज्याने तुमचं नातं आणखी घट्ट होईल.
advertisement
1/9
रिलेशनशिप कोचने दिल्या टिप्स! बायको-गर्लफ्रेंडला खुश ठेवण्याचा सिम्पल फॉर्म्युला
पुरुषांची आणि महिलांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे बऱ्याचदा जोडप्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष दरवेळी खूप गंभीर नसला तरीही कधीतरी भांडण विकोपाला जाऊ शकतं. म्हणूनच रिलेशनशिप कोच सीमा आनंद यांनी खास पुरुषांना काही टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे ते आपल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला खुश ठेऊ शकतील.
advertisement
2/9
नुकत्याच सीमा आनंद या एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीसाठी आल्या होत्या. तिथे त्यांनी सांगितले की, 'पुरुषांनी तुलना करण्यापेक्षा सर्वात आधी हे स्वीकारावे की, त्यांचा जोडीदार त्यांच्यापेक्षा वेगळा आहे.'
advertisement
3/9
तुमच्या जोडीदाराची विचार आणि वागण्याची पद्धतही वेगळी असू शकते. म्हणून तुमच्या जोडीदाराला तुमच्या इच्छेनुसार घडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते तुमच्यापेक्षा वेगळे कसे आणि का आहे हे समजून घ्या. तुम्हाला फरक कळला की आपसूकच तुमचा संवाद चांगला होईल.
advertisement
4/9
बऱ्याचदा पुरुषांना झुकते माप घेणे जमत नाही, त्यात त्यांना कमीपणा वाटतो. पण खरं तर पुरुषांना या मानसिकतेपासून मुक्त होणे आवश्यक आहे. इतरांना काय वाटेल यापेक्षा तुमच्या जोडीदाराला काय वाटते हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून कधीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झुकणे कमी नाही, तर तुमचं नातं टिकवून ठेवण्याची ती एक गुंतवणूक तुम्ही समजू शकता.
advertisement
5/9
बऱ्याच पुरुषांना जास्त बोलायला आवडत नाही. मात्र महिलांना बोलताना सगळ्या गोष्टी सवस्तरपणे सांगायला आवडतात. मग ते बोलणं प्रत्यक्षात असो किंवा मेसेजवर. पुरुष मेसेजेस सरळ वाचतात, मात्र महिला त्यामध्ये असलेल्या प्रत्येक पूर्णविराम आणि स्वल्पविरामाचा अर्थ लावतात.
advertisement
6/9
काही पुरुषांना समोरासमोर बोलणे अवघड वाटते. अशावेळी व्हॉट्सअॅप किंवा मेसेजिंग तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुमच्या जोडीदाराशी मेसेजद्वारे खूप फ्लर्ट करा आणि मेसेजद्वारे तुमच्या भावना व्यक्त करा. याने तुमचा जोडीदार नाकीयच खुश होईल.
advertisement
7/9
थोडं बोलण्याची आणि संवाद साधण्याची सवय वाढावा. महिलांना दिवसभरातील सर्वकाही सांगण्याची इच्छा आणि सवय असते. तर पुरुषांकडे मात्र बोलण्यासारखं फार काही नसतं. अशावेळी संवाद होत नाही. तुमच्या पार्टनरशी बोलण्यासाठी काही विषय निवडा. संवादामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. म्हणजे तुमचा संवाद आणि तुमचं नातं कधीही बोअरिंग होणार नाही. मुलींना स्वाभाविकच बोलणं खूप आवडतं आणि कधीकधी शांतपणे ऐकून घेणंही.
advertisement
8/9
कोणालाही गृहीत धरणे कधीच योग्य नाही. तुमच्या नात्यामध्ये काही समस्या असेल किंवा तुम्हाला काही खटकत असेल तर त्याबाबद्दल बोला. काहीतरी चुकतंय असं वाटतं असेल तरी बोला. पार्टनरला गृहीत धरणं योग्य नाही. यामुळे नात्यात संघर्ष आणखी वाढतात.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Relationship Tips : रिलेशनशिप कोचने दिल्या खास टिप्स! बायको-गर्लफ्रेंडला खुश ठेवण्याचा 'हा' आहे सिम्पल फॉर्म्युला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल