TRENDING:

Rinku Rajguru: बैलगाडीतून मिरवणूक अन् ढोल-ताशांचा गजर; रिंकू राजगुरूने जिंकली गावकऱ्यांची मनं

Last Updated:
रिंकू राजगुरूने बोरफडी गावात मुख्यमंत्री ग्राम समृद्ध आणि प्लास्टिक मुक्त अभियाना सुरू केला. सैराट डायलॉगमुळे गावात उत्साह, बैलगाडीतून स्वागत, फोटोसाठी चाहत्यांची गर्दी.
advertisement
1/10
बैलगाडीतून मिरवणूक अन् ढोल-ताशांचा गजर; रिंकू राजगुरूने जिंकली गावकऱ्यांची मनं
बीड : बीड जिल्ह्यातील बोरफडी गावासाठी आजचा दिवस एखाद्या दिवाळीसारखा होता. निमित्त होतं 'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियाना'चं, पण गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
advertisement
2/10
यामागचं कारण म्हणजे सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू हिने स्वतः बोरफडी गावात हजेरी लावली आणि या महत्त्वाच्या अभियानाचा शुभारंभ केला.
advertisement
3/10
साध्या सुती साडीत, कपाळावर छोटी टिकली अन् चेहऱ्यावर तेच सात्विक हास्य घेऊन रिंकू गावात दाखल झाली आणि अख्खं बोरफडी गाव रस्त्यावर उतरलं.
advertisement
4/10
रिंकूच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी कल्पकतेची सीमा गाठली होती. कोणत्याही आलिशान गाडीतून नव्हे, तर फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून रिंकूची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
5/10
ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रिंकूचं स्वागत करण्यात आलं. रिंकूला पाहण्यासाठी तरुण-तरुणींपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांची एकच गर्दी उसळली होती. अनेकांनी आपल्या घराच्या छतावर उभं राहून 'आर्ची'चं दर्शन घेतलं.
advertisement
6/10
गावात पोहोचल्यानंतर रिंकूच्या हस्ते 'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियाना'चा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी तिला तिच्या सुपरहिट चित्रपट सैराटमधील एखादा डायलॉग बोलण्याचा आग्रह केला.
advertisement
7/10
गावकऱ्यांच्या प्रेमाखातर रिंकूने माईक हातात घेतला आणि 'सैराट' चित्रपटातील तो प्रसिद्ध डायलॉग म्हटला आणि गावकऱ्यांमध्ये एकच उत्साह संचारला. डायलॉग ऐकताच संपूर्ण बोरफडी गावात शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
advertisement
8/10
केवळ उद्घाटन करून रिंकू थांबली नाही, तर तिने समाजाला एक महत्त्वाचा संदेशही दिला. रिंकूच्या हस्ते गावात 'प्लास्टिक मुक्त अभियाना'चा प्रारंभ करण्यात आला. "आपलं गाव सुंदर ठेवायचं असेल तर प्लास्टिकला हद्दपार करा," असं आवाहन तिने यावेळी केलं.
advertisement
9/10
रिंकूच्या उपस्थितीमुळे बोरफडीतील गावकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
advertisement
10/10
रिंकू सध्या तिच्या 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru: बैलगाडीतून मिरवणूक अन् ढोल-ताशांचा गजर; रिंकू राजगुरूने जिंकली गावकऱ्यांची मनं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल