दरवाजा उघडेना, दुर्गंधी यायला लागली, पोलिसांनी दार तोडलं, बीडच्या लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद अंत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
माजलगावच्या एका लॉजमध्ये तरूणाचा संशयास्पद अंत झाला. रूममधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने लॉजच्या मालकाने पोलिसांच्या सहाय्याने दार उघडले असता त्यांना तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळाले.
advertisement
1/5

बीडच्या माजलगाव शहरातील एका लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
कृष्णा डाके (रा. नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी 15 तारखेला शहरातील व्यंकटेश लॉज येथे रूम क्रमांक 205 बुक केली होती.
advertisement
3/5
त्यानंतर ते बाहेर न आल्याने आणि रूममधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने संशय व्यक्त केला.
advertisement
4/5
20 तारखेला दरवाजा आतून बंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडून पाहणी केली असता कृष्णा डाके यांचा मृतदेह रूममध्ये आढळून आला.
advertisement
5/5
प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीतच असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
दरवाजा उघडेना, दुर्गंधी यायला लागली, पोलिसांनी दार तोडलं, बीडच्या लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद अंत