Summer Health : गोड उसाचा रस, 'हे' त्रास असलेल्या महिलांसाठी ठरू शकतो विष! तुम्ही यातल्या तर नाही?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Sugarcane Juice Dangers : उन्हाळ्यात उसाचा रस सर्वांना प्यायला आवडतो. कडक उन्हात याने आपल्याला खूप बरंही वाटतं. पण तुम्हाला माहितीये का, काही त्रास किंवा आजार असलेल्या महिलांना उसाचा रस बाधू शकतो.
advertisement
1/7

महिलांच्या शरीरात कायम बदल होता असतात. त्यामुळे कधी कोणत्या गोष्टीचा त्रास होईल सांगणं अवघड होतं. उसाचा रसही काही महिलांसाठी काही परिस्थितींमध्ये त्रासदायक ठरू शकतो.
advertisement
2/7
याचा अंदाज तुम्हाला असेलच. मधुमेह असणाऱ्या स्त्रियांनी किंवा कोणीही उसाचा रस पिणं योग्य नाही. मधुमेह असल्यास उसाचा रस डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्यावा. कारण एका ग्लास उसाच्या रसात जवळपास 40-50 ग्रॅम साखर असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळं रक्तातली साखर वेगाने वाढू शकते.
advertisement
3/7
ज्यांना वजन कमी करायचं असेल, तर उसाचा रस अजिबात पिऊ नका. कारण यामध्ये त्यात 150-180 कॅलरीज असतात. उसाच्या रसातली साखर द्रव असल्यामुळे तो प्यायल्यानं पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि वारंवार भूक लागू शकते. यामुळे आपण जास्त खातो आणि नकळत वजन वाढायला लागते.
advertisement
4/7
ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी उसाचा रस पिणं टाळावं. कारण उसाच्या रसात असलेल्या सुक्रोजचे शरीरात गेल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे दोन भाग होतात. यातलं अतिरिक्त फ्रुक्टोज यकृतामध्ये चरबीच्या रूपात जमा होऊ शकतं आणि यामुळे ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. म्हणून ज्या महिलांना फॅटी लिव्हरचा त्रास असेल त्यांनी वारंवार किंवा नियमितपणे उसाचा रस पिऊ नका.
advertisement
5/7
तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय उसाचा रस अजिबात पिऊ नका. कारण उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये सुमारे 250-300 मिलिग्रॅम पोटॅशियम असते. हे पोटॅशियम शरीरात साठून हृदय आणि स्नायूंवर परिणाम करू शकते. म्हणूनच उसाचा रस प्यायल्यानं किडनीच्या समस्या आणखी वाढू शकतात.
advertisement
6/7
ज्या महिलांना इरिटेबल बाऊल सिंड्रोमचा त्रास आहे त्यांनीही उसाचा रस टाळावा. हा आजार पचनसंस्था कमकुवत करतो. यामुळे पोटदुखी, पोटात गोळे येणे, पोट फुगणे, गॅस आणि अतिसार किंवा बद्धकोष्ठता हे त्रास होतात. त्यात उसाचा रस प्यायल्यास हा त्रास वाढू शकतो. म्हणून ज्यांचे पोट संवेदनशील आहे किंवा ज्यांना पोटात त्रास होत असेल त्यांनी उसाचा रस पिऊ नका.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Health : गोड उसाचा रस, 'हे' त्रास असलेल्या महिलांसाठी ठरू शकतो विष! तुम्ही यातल्या तर नाही?