TRENDING:

असं आहे महेंद्रसिंग धोनीचं गाव, जिथं 320 फुटांवरून कोसळतात धबधबे PHOTOS

Last Updated:
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचं केवळ धोनीशी खास नातं आहे, म्हणून लोक तिथे फिरायला जातात. आपणही कधी रांचीला गेलात, तर तिथले धबधबे पाहायला विसरू नका. रांचीला अत्यंत मनमोहक असं नैसर्गिक सौंदर्य लाभलं आहे.
advertisement
1/5
असं आहे धोनीचं गाव, जिथं 320 फुटांवरून कोसळतात धबधबे PHOTOS
गौतम डोंगरावरून कोसळणाऱ्या जोन्हा धबधब्याला 'गौतमधारा' म्हणूनही ओळखलं जातं. हा 140 फूट धबधबा पाहण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अगदी अद्भुत असतो. या डोंगरावर एक प्राचीन बौद्ध मंदिर आहे. शिवाय इथं बौद्ध धर्माबाबत अनेक शिल्पदेखील साकारलेले आहेत. स्वतः भगवान गौतम बुद्ध याठिकाणी आले होते, अशी मान्यता आहे.
advertisement
2/5
हा आहे सीता धबधबा, जो 144.0 फूट उंचीवरून कोसळतो. सुवर्णरेखा नदीची उपनदी असलेल्या राढू नदीवरील या धबधब्याजवळ देवी सीतेचं मंदिर आहे. असं म्हणतात की, सीता दैनंदिन जीवनातील विविध कामांसाठी याच धबधब्याचं पाणी वापरत असे. हा सुंदरसा धबधबा रांचीपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
advertisement
3/5
रांचीपासून 72 किलोमीटर अंतरावर असलेला हिरणी धबधबा पाहाल तर पाहतच राहाल. निसर्गसंपन्न अशा या धबधब्याशेजारी आपण सहलीसाठी जाऊ शकता. विशेषतः नववर्षाच्या स्वागतासाठी इथं पर्यटक हजेरी लावतात. उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि आजूबाजूला हिरवीगार झाडं, अशा इथल्या थंडगार वातावरणात मन प्रसन्न होतं.
advertisement
4/5
रांची शहरापासून 34 किलोमीटर अंतरावर असलेल्या तामडा गावाजवळील रांची टाटा रोडवर दशम धबधबा आहे. 144 फूट उंचीवरून 10 भागांमधून कोसळणारा हा धबधबा पाहणं म्हणजे एक रोमांचक अनुभव असतो.
advertisement
5/5
हुंडरू धबधबा हे रांची शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे. शिवाय 320 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा झारखंडमधील उंच धबधब्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे हा धबधबा जितका उंच आहे तितकाच धोकादायकही आहे. इथं दरवर्षी बुडून मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
असं आहे महेंद्रसिंग धोनीचं गाव, जिथं 320 फुटांवरून कोसळतात धबधबे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल