सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्प्रेस वेचं काम जोमात! लवकरच 120च्या स्पीडने धावणार कार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
देशातल्या सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेचं काम अगदी वेगाने सुरू आहे. दिल्ली-मुंबई असा हा महामार्ग असून देशाच्या विविध भागांमध्ये त्याचं काम करण्यात येतंय. त्याची दिल्लीतली वाहतूक सुरू झाली आहे. तर, राजस्थानच्या कोटामधील सवाई माधोपूर भागातलं कामही जवळपास पूर्ण झालंय.
advertisement
1/7

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांमधून जाईल. 1,350 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचं भूमीपूजन 2019 साली करण्यात आलं होतं.
advertisement
2/7
8 लेनच्या या मार्गाचं बांधकाम अत्यंत आधुनिक पद्धतीने केलं जातंय. जर्मन पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या या मार्गावर कितीही वेगात गाडी चालवली तरी चालकाला किंवा प्रवाशांना अजिबात धक्के बसणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर कुठेही ब्रेकर नाही.
advertisement
3/7
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कोटा-सवाई माधोपूर भागात चंबळ नदी आहे. या नदीवर पूल बांधण्याचं काम वेगाने केलं जातंय. या भागातील पुलाचं कामच अतिशय अवघड होतं. जे येत्या काही दिवसांत पूर्ण होईल.
advertisement
4/7
एक्प्रेस वे तयार झाल्यानंतर कोटा आणि सवाई माधोपूरहून जयपूर, अलवर, दिल्ली, मुंबई, उज्जैन, रतलामसह इतर अनेक शहरांमध्ये जाण्याचा कालावधीही कमी होईल. सवाई माधोपूर ते दिल्ली हे अंतर 3 तासांत पार करता येईल, तर मुंबईला जायला 9 तास लागतील.
advertisement
5/7
सवाई माधोपूरमध्ये उत्पादित होणाऱ्या भाज्या आणि पेरूंची देश-विदेशात निर्यात होते. इथल्या पेरूंना मोठ्या प्रमाणात दिल्लीत मागणी असते. त्यामुळे आता इथून दिल्लीचा प्रवास जवळ होणार असल्याने त्याचा पेरू उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल.
advertisement
6/7
कोटा भागातील गहू, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीन अशा विविध पदार्थांना देशभरात मागणी असते. या एक्प्रेस वेमुळे इथला माल दिल्ली आणि मुंबईत पोहोचवणं शक्य होईल, परिणामी याचादेखील उत्पादक आणि व्यापाऱ्यांना फायदाच होईल.
advertisement
7/7
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर कार प्रतितास 120 किलोमीटर वेगाने चालवता येईल. तर, ट्रकचा वेग 80 किलोमीटर प्रतितास इतका असेल. महत्त्वाचं म्हणजे या मार्गावरून धीम्या गतीची वाहनं चालवण्यास मनाई असेल. शिवाय या मार्गावर ठरविक किलोमीटरवर विश्रांती गृहदेखील बांधण्यात आले आहेत. याठिकाणी हॉटेल, ढाबा, पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशनसह प्रवाशांना विविध उपयुक्त सुविधा उपलब्ध असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्प्रेस वेचं काम जोमात! लवकरच 120च्या स्पीडने धावणार कार