नपुंसकता, अशक्तपणा करते दूर; आजारांचा जणू यमराज आहे ही वनस्पती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या देशात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. यापैकी काही वनस्पती मानवासाठी जणू वरदान आहेत. गंभीर आजारांवर उपचार म्हणून त्यांचा वापर होतो. परंतु आपल्याला माहितीच्या अभावामुळे त्यांचा पूर्ण लाभ घेता येत नाही. सप्तपर्णी ही वनस्पतीही त्यापैकीच एक. आपण कदाचित तिचं नावही कधी ऐकलं नसेल. मात्र अनेक गंभीर आजार बरे करण्याची क्षमता या वनस्पतीत आहे.
advertisement
1/5

सप्तपर्णी अर्थात ब्लॅकबोर्ड ट्री. डिसेंबर ते मार्च या काळात या वनस्पतीला फुलं येतात. लहान हिरवी आणि पांढरी अशी ही फुलं असतात. मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही वनस्पती पाहायला मिळते.
advertisement
2/5
फुलांना अत्यंत सुरेख असा सुगंध असतो. खरंतर वासावरूनच फुलांची ओळख पटते. परंतु आश्चर्य म्हणजे सप्तपर्णी वनस्पतीलाही विशिष्ट सुगंध असतो. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. सप्तपर्णी हिमालयातही आढळते.
advertisement
3/5
सप्तपर्णी ही वनस्पती विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. या वनस्पतीच्या सेवनानं अनेक आजार बरे होतात. त्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते.
advertisement
4/5
सप्तपर्णीमुळे शरिरातला अशक्तपणा दूर होऊ शकतो. शिवाय ओल्या जखमाही भरून निघू शकतात. त्यामुळे ही वनस्पती शरिराला ऊर्जा देते आणि त्वचेवर गुणकारी असते.
advertisement
5/5
महत्त्वाचं म्हणजे नपुंसकत्त्व आणि कावीळसारख्या गंभीर आजारांवरही सप्तपर्णी वनस्पतीच्या मदतीने मात करता येते. शिवाय या बहुगुणी वनस्पतीचा सुगंध अत्यंत मनमोहक असतो.