Banned Food : जगभरातील बॅन केलेले 10 पदार्थ तुम्हाला माहितेय? एक तर मसाल्याच्या भाजीत रोज वापरला जातो
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Worldwide banned food : जगभरात असे काही अन्नपदार्थ आहेत, जे बॅन आहेत. त्यांचा वापर अनेक देशांमध्ये केला जात नाही. एकेकाळी हे पदार्थ सगळीकडे सर्रास वापरले जायचे मात्र आता यांच्या वापरावर बंदी केली गेली आहे.
advertisement
1/9

किंडर सरप्राईज एग्स : हे लहान मुलांना दिला जाणारा एक चॉकलेटसारखा प्रकार आहे. तुम्हाला याबद्दल महित असेलच. हे किंडर सरप्राईज एग्स अमेरिकेत बराच काळ बंद होते . कारण यामध्ये चॉकलेटच्या आवरणात एक खेळणं असायचं, जे लहान मुलांच्या घशात अडकण्याची शक्यता होती.
advertisement
2/9
कच्चं दूध : कच्च्या दुधामध्ये साल्मोनेला आणि ई. कोलाय सारखे हानीकारकी सूक्ष्मजीव असतात. त्यामुळे अनेक देशांमध्ये कच्चं दूध विकण्यावर बंदी घालण्यात आलीय.
advertisement
3/9
फुगु : फुगू ही डिश जगातील सर्वात धोकादायक असलेल्या माशांपैकी एक असणाऱ्या पफरफिशपासून फिशपासून बनवली जाते. हा पदार्थ जपानी आहे. यात धोकादायक विष असू शकते. ज्यामुळे स्ट्रोक आणि मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणूनच जपानमध्ये हा पदार्थ फक्त लायसन्स असणारे शेफच बनवू शकतात.
advertisement
4/9
खसखस : खसखसचा वापर आपण रोज करतो. जेव्हा मसाल्याची भाजी बनवली जाते तेव्हा त्यामध्ये खसखस वर्जून टाकलात. इतरही अनेक पदार्थांमध्ये ही महागडी खसखस वापरली जाते. खसखसचा संबंध मादक पदार्थांच्या उत्पादनात केला जातो. त्यामुळे काही देशांमध्ये खसखसच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.
advertisement
5/9
शार्क फिन सूप : शार्क माशाच्या पंखांपासून बनवल्या जाणाऱ्या या सूपसाठी मासेमारी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यामुळे शार्कची संख्या खूप कमी होऊ लागली. म्हणूनच अनेक ठिकाणी शार्क फिन सूपवर बंदी घालण्यात आलीय.
advertisement
6/9
हॅगिस : या पदार्थाबद्दल कोणाला सांगायचं झालं तर हॅगिस हा एक पारंपरिक स्कॉटिश पदार्थ आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी त्यामध्ये मेंढीच्या फुफ्फुसाचा केला जातो. म्हणूनच अमेरिकेत त्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आलीय. अमेरिकेच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार याला परवानगी नाही.
advertisement
7/9
दुरियन : हे एक प्रकारचे फळ आहे. ज्याला विशिष्ट वास असतो. हे कुप्रसिद्ध फळ आशियातील विविध भागांमध्ये हॉटेल्स आणि सार्वजनिक वाहतूक, अशा सार्वजनिक ठिकाणी बॅन आहे. हे फळ खाणं बेकायदेशीर नाही. मात्र त्याच्या वासामुळे त्यावर बंदी घालण्यात आलीय. (All Image Credit : canva)
advertisement
8/9
कासू मार्झू : कासू मार्झू हा चीजचा एक प्रकार आहे. हे इटलीमधील पारंपरिक चीज आहे. यामध्ये किटकांच्या अळ्या असतात. या चीजला एक स्वादिष्ट पदार्थ म्हंटलं जातं. पण स्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्यांमुळे युरोपियन युनियनच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार त्यावर बंदी घालण्यात आलीय. (Image Credit : Wikipedia)
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Banned Food : जगभरातील बॅन केलेले 10 पदार्थ तुम्हाला माहितेय? एक तर मसाल्याच्या भाजीत रोज वापरला जातो